शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

ISROची अंतराळात मोठी झेप, ३६ उपग्रहांसह सर्वात वजनदार LVM3 रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2023 09:36 IST

इस्रोनं (ISRO) ३६ वनवेब इंटरनेट उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करून आणखी एक इतिहास रचला आहे. पाहा व्हिडीओ.

भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोनं (ISRO) ३६ वनवेब इंटरनेट उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करून आणखी एक इतिहास रचला आहे. भारताचे सर्वात वजनदार लाँच रॉकेट, लाँच व्हेईकल मार्क-III (LVM-III) लो अर्थ ऑर्बिट (LEO) मध्ये प्रक्षेपित करण्यात आलं. सकाळी ८.३० वाजल्यापासून रॉकेट लाँच करण्याची प्रक्रिया सुरू झाली. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून याचं प्रक्षेपण करण्यात आलं. फेब्रुवारीमध्ये SSLV-D2/EOS07 मिशनच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर २०२३ मधील इस्रोची ही दुसरी यशस्वी कामगिरी आहे.अधिकृत माहितीनुसार, ४३ मीटर उंच इस्रोच्या रॉकेटनं ब्रिटनच्या एका कंपनीच्या ३६ उपग्रहांना एकत्र घेऊन उड्डाण केलं. LVM3 ने ज्या उपग्रहांसह उड्डाण केलं त्यांचं एकूण वजन ५ हजार ८०५ टन आहे. या मोहिमेला LVM3-M3/OneWeb India-2 असं नाव देण्यात आलं आहे. इस्रोनं ट्वीट करून या मिशनच्या प्रक्षेपणाची माहिती दिली होती.७२ उपग्रह लाँच करण्याचा करारLVM3 हे इस्रोचं सर्वात वजनदार प्रक्षेपण यान आहे ज्यानं चांद्रयान-२ मोहिमेसह आतापर्यंत पाच यशस्वी उड्डाणं पूर्ण केली आहेत. खरं तर, ब्रिटनच्या वनवेब ग्रुप कंपनीनं ७२ उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी इस्रोची व्यावसायिक शाखा, न्यूजस्पेस इंडिया लिमिटेडशी करार केला होता.कोण आहे वन वेब कंपनी?एअरटेल म्हणजेच भारती एंटरप्रायझेस ही ब्रिटीश स्टार्टअप कंपनी वन वेबमध्येही शेअरहोल्डर आहे. इस्रोचे वनवेबसोबत दोन करार आहेत, त्यापैकी एक गेल्या वर्षी झाला होता. या रॉकेटमधून दुसऱ्यांदा खासगी कंपनीचा उपग्रह वाहून नेण्यात आले असून याचा सक्सेस रेट १०० टक्के आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येही इस्रोने LVM3 रॉकेटने वनबेसचे ३६ उपग्रह प्रक्षेपित केले होते.

टॅग्स :isroइस्रोIndiaभारत