पहिली स्लीपर वंदे भारत धावणार; कती असेल भाडे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 06:21 IST2026-01-02T06:20:40+5:302026-01-02T06:21:21+5:30
पश्चिम बंगालमधील हावडा आणि आसाममधील गुवाहाटीदरम्यान धावणाऱ्या वंदे भारत स्लीपर ट्रेनचे भाडे हवाई प्रवासाच्या तुलनेत लक्षणीयरीत्या कमी असेल.

पहिली स्लीपर वंदे भारत धावणार; कती असेल भाडे?
नवी दिल्ली : कोलकाता आणि गुवाहाटीदरम्यान धावणाऱ्या देशातील पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनला पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच हिरवा झेंडा दाखवतील, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी येथे दिली.
पश्चिम बंगालमधील हावडा आणि आसाममधील गुवाहाटीदरम्यान धावणाऱ्या वंदे भारत स्लीपर ट्रेनचे भाडे हवाई प्रवासाच्या तुलनेत लक्षणीयरीत्या कमी असेल. गुवाहाटी–हावडा दरम्यानचा विमान प्रवासाचा खर्च साधारणतः ६,००० ते ८,००० रुपये इतका आहे तर वंदे भारतमध्ये थर्ड एसीचे भाडे जेवणासह सुमारे २,३०० रुपये, सेकंड एसी सुमारे ३,००० रुपये आणि फर्स्ट एसीचे भाडे सुमारे ३,६०० रुपये असेल, असे वैष्णव यांनी सांगितले. ही सेवा पुढील १५ ते २० दिवसांत, कदाचित १८ किंवा १९ जानेवारीच्या सुमारास सुरू होईल.