शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने कमान सांभाळली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
5
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
6
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
7
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
8
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
9
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
10
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
11
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
12
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
13
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
14
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
15
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
16
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
17
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
18
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
19
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
20
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?

बिग फाइट: चहामळा कामगारांच्या हाती केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य!

By गजानन चोपडे | Updated: April 11, 2024 12:46 IST

बिग फाइट: विद्यमान खासदाराला भाजपने उमेदवारी नाकारली

गजानन चोपडेराज्याच्या दिब्रुगड लोकसभा मतदारसंघात चहामळा कामगारांचे वर्चस्व आहे. त्यांच्याच मतांवर विजयाचे गणित अवलंबून असते. त्यामुळे विद्यमान खासदार रामेश्वर तेली यांचे तिकीट कापून भाजपने यंदा केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्यावर डाव लावला आहे.

गेल्या दोन निवडणुकीत भाजपने बाजी मारली होती. इंडिया आघाडीत हा मतदारसंघ आसाम जातीय परिषदेच्या वाट्याला गेला आणि लुरीनज्योति गोगाई या कामगार नेत्याला भाजपविरुद्ध मैदानात उतरविण्यात आले. लोकसभेच्या एकूण १४ जागांपैकी दिब्रुगडकडे सध्या साऱ्यांचे लक्ष आहे. इंडिया आघाडीनेही तगडा उमेदवार दिल्याने    

सोनोवाल यांचे भवितव्य चहामळा कामगारांच्या हाती आहे. शिवाय उमेदवारी नाकारल्याने रामेश्वत तेली नाराज आहेतच. दिब्रुगडमध्ये झालेल्या विकासकामांचा त्यांना फायदा होण्याची शक्यता आहे. 

निवडणुकीतील कळीचे मुद्दे

चहामाळ्यांसाठी दिब्रुगड प्रसिद्ध आहे. या मतदारसंघावर चहामाळ्यातील कामगारांचे मोठे वर्चस्व असून हीच मते विजयी उमेदवारासाठी निर्णायक ठरतात. या कामगार मतदारांची संख्या ३० टक्के आहे, हे विशेष. आम आदमी पार्टीच्या धर्तीवर असम गण परिषदेची स्थापना झाली. २००४ मध्ये असम गण परिषदेचे सर्बानंद सोनोवाल याच मतदारसंघातून विजयी झाले. आता त्यांनाच भाजपने उमेदवारी दिली आहे.स्वातंत्र्यापासून काँग्रेसने वर्चस्व राखलेल्या दिब्रुगडमध्ये यंदा या पक्षाचा उमेदवार नाही. इंडिया आघाडीच्यावतीने लुरीनज्योति गोगोई यांना मैदानात उतरविले आहे. कामगारांसाठी लठणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे.

 २०१९ मध्ये काय घडले?रामेश्वर तेली    भाजप (विजयी)    ६,५९,५८३पबनसिंग घाटोवार    काँग्रेस    २,९५,०१७ भाबेन बरुहा    एनपीईपी    ९,७१८नोटा    -    २१,२८८

२०१९ पूर्वीच्या निवडणुकीत कोणाची बाजी?

वर्ष    विजयी उमेदवार    पक्ष    मते    टक्के२०१४    रामेश्वर तेली     भाजप    ४,९४,३६४    ४८%२००९    पबनसिंग घाटोवार    काँग्रेस    ३,५९,१६३    ३५%२००४    सर्बानंद सोनोवाल    एजीपी    २,२०,९४४    २१%१९९९    पबनसिंग घाटोवार    काँग्रेस    २,७०,८६३    २६%१९९८    पबनसिंग घाटोवार    काँग्रेस    २,३४,१९५    २३%

टॅग्स :ElectionनिवडणूकAssamआसामlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाministerमंत्री