तीन महिन्यांपूर्वी पतीची हत्या, विरहाने खचलेल्या भाजपा नेत्याच्या पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2024 14:36 IST2024-09-26T14:36:13+5:302024-09-26T14:36:42+5:30
Monu Kalyane Wife Death: काही महिन्यांपूर्वी मध्य प्रदेशमधील इंदूर येथे भाजपा नेता मोनू कल्याणे याच्या झालेल्या हत्येमुळे खळबळ उडाली होती. दरम्यान, या हत्येला काही महिने उलटत नाहीत तोच कल्याणे याच्या कुटुंबामध्ये आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे.

तीन महिन्यांपूर्वी पतीची हत्या, विरहाने खचलेल्या भाजपा नेत्याच्या पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
काही महिन्यांपूर्वी मध्य प्रदेशमधील इंदूर येथे भाजपा नेता मोनू कल्याणे याच्या झालेल्या हत्येमुळे खळबळ उडाली होती. दरम्यान, या हत्येला काही महिने उलटत नाहीत तोच कल्याणे याच्या कुटुंबामध्ये आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. मोनू कल्याणे याची पत्नी दीपिका हिने गळफास घेऊन जीवन संपवल्याचं समोर आलं आहे. पतीच्या हत्येनंतर दीपिका शोकाकुल आणि उदास झाली होती. ती तणावाखाली होती. पतीच्या अकाली मृत्यूमुळे तिला धक्का बसला होता. अखेरीस तिने आज टोकाचं पाऊल उचलत स्वत:चं जीवन संपवलं. आता पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना २५ सप्टेंबर रोजी सकाळी घडली. पोलिसांनी सांगितले की, कुटुंबीयांना दीपिका ही घरातील बाथरूमध्ये गळफास घेतलेल्या स्थितीत सापडली. त्यानंतर कुटुंबीयांना आराडाओरडा करण्यास सुरुवात केली. तिला लागलेला गळफास सोडवून रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घचनास्थळी धाव घेतली. तसेच फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळावरील पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली. त्यानंतर कुटुंबीयांचे जबाब नोंदवले.
दरम्यान, कुटुंबीयांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार मोनूच्या मृत्यूनंतर दीपिका तणावामध्ये होती. ती सतत रडत राहायची आणि न्याय देण्याची मागणी करायची. मला मोनूकडे जायचं आहे, असं सतत म्हणायची. त्यामुळे कुटुंबीयांनी मोनूच्या हत्येनंतर तिला मोनूच्या खोलीत कधी जाऊ दिलं नव्हतं. त्यामुळे तिचा शोक अधिकच वाढला होता. तिने जीवाचं काही बरं वाईट करू नये म्हणून तिची सासू सतत तिच्यासोबत राहायची. २५ सप्टेंबर रोजी वॉशरूममध्ये जाण्याचा बहाणा करून ती गेली आणि तिनं टोकाचं पाऊल उचलत जीवन संपवलं.