देशातील शिक्षण व्यवस्था केंद्र सरकारमुळे उद्ध्वस्त, काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 05:59 IST2025-04-01T05:58:54+5:302025-04-01T05:59:29+5:30
Sonia Gandhi Criticize Central Government: देशातील सार्वजनिक शिक्षण व्यवस्था केंद्र सरकार उद्ध्वस्त करत असल्याची टीका काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी सोमवारी म्हटले आहे.

देशातील शिक्षण व्यवस्था केंद्र सरकारमुळे उद्ध्वस्त, काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांची टीका
नवी दिल्ली - देशातील सार्वजनिक शिक्षण व्यवस्था केंद्र सरकार उद्ध्वस्त करत असल्याची टीका काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी सोमवारी म्हटले आहे. केंद्र सरकारने अमलात आणलेल्या नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाचे मुख्य ध्येय सत्तेचे केंद्रीकरण, व्यापारीकरण तसेच खासगी क्षेत्राला गुंतवणुकीचे आउटसोर्सिंग करणे, पाठ्यपुस्तकांमध्ये जातीयता पसरविणारा मजकूर अंतर्भूत करणे हे आहे अशी टीका त्यांनी केली.
एका वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखात त्यांनी म्हटले आहे की, केंद्रीकरण, व्यापारीकरण आणि जातीयता या तीन गोष्टी सध्या भारतीय शिक्षण व्यवस्थेला ग्रासले आहे. भारतीय मुले, युवक यांचे शिक्षण, त्यांचा भावी काळ याबद्दल २०२०च्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात सखोल विचार करण्यात आलेला नाही. शिक्षणक्षेत्रातील सरकारची गुंतवणूक कमी करून त्यातील कामे खासगी क्षेत्राकडे वळविली जात आहेत.
‘भाजप, संघाकडून कायम द्वेषाची पेरणी’
सोनिया गांधी यांनी सांगितले की, भारताच्या शिक्षण पद्धतीत द्वेषाची पेरणी करण्यासाठी रा. स्व. संघ व भाजप यापुढे दीर्घकाळ प्रयत्न करत राहाणार आहेत. महात्मा गांधी यांची हत्या, मुघलांची राज्यव्यवस्था यावरील धडे इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांतून वगळण्यात आले असल्याचा आरोपही त्यांनी केला.