हृदयद्रावक! चालकाचं नियंत्रण सुटून स्कूल बसला भीषण अपघात, सहा मुलांचा मृत्यू  

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 11:29 AM2024-04-11T11:29:26+5:302024-04-11T11:30:08+5:30

School Bus Accident In Haryana: हरियाणामधील महेंद्रगड जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला आहे. येथे आज सकाळी एका खाजगी शाळेची स्कूलबस चालकाचं नियंत्रण सुटून उलटली. या अपघातामध्ये ६ मुलांचा मृत्यू झाला. तर १२ हून अधिक मुलं जखमी झाली आहेत.

The driver lost control of the school bus in a terrible accident In Haryana, killing six children | हृदयद्रावक! चालकाचं नियंत्रण सुटून स्कूल बसला भीषण अपघात, सहा मुलांचा मृत्यू  

हृदयद्रावक! चालकाचं नियंत्रण सुटून स्कूल बसला भीषण अपघात, सहा मुलांचा मृत्यू  

हरियाणामधील महेंद्रगड जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला आहे. येथे आज सकाळी एका खाजगी शाळेची स्कूलबस चालकाचं नियंत्रण सुटून उलटली. या अपघातामध्ये ६ मुलांचा मृत्यू झाला. तर १२ हून अधिक मुलं जखमी झाली आहेत. हा अपघात कनिनाजवळ कनिना-दादरी रस्त्यावर झाला.

मिळालेल्या माहितीनुसार उन्हानी गावाजवळ मुलांना घेऊन जास असलेली बस उलटली. ही बस जीएल पब्लिक स्कूल या खासगी शाळेची होती. त्यामध्ये सुमारे ३५ ते ४० मुले होती. आज रमजान ईदनिमित्त शाळेला सुट्टी होती. मात्र तरीही शाळा सुरू ठेवण्यात आली होती. तसेच मुलांना नेण्यासाठी शाळेतून बस पाठवण्यात आली होती.  

मिळालेल्या माहितीनुसार अपघात झाल्यानंतर स्थानिक नागरित तत्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तिथे मदत रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. मात्र तोपर्यंत पाच मुलांचा मृत्यू झाला होता. तर एकाची प्रकृती गंभीर होती. त्याला रुग्णालयात दाखल करून व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र तिथे त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या मुलांची संख्या ही ६ एवढी झाली. 

Web Title: The driver lost control of the school bus in a terrible accident In Haryana, killing six children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.