नोटा मोजता-मोजता मशिन गरम होतायत अन् विरोधी पक्षांच्या नेत्यांना वाटते...; अमित शाह यांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 04:48 PM2024-03-20T16:48:36+5:302024-03-20T16:49:13+5:30

ईडीने जेवढी संपत्ती जप्त केली आहे, त्यांतील केवळ 5 टक्के संपत्तीच राजकीय पक्षांशी संबंधित लोकांची आहे. उर्वरित 95 टक्के काळा पैसा असलेले लोक आहेत, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे.

The counting machine heats up Leaders of opposition parties feel that no action should be taken Direct attack congress rahul gandhi and tmc by Amit Shah | नोटा मोजता-मोजता मशिन गरम होतायत अन् विरोधी पक्षांच्या नेत्यांना वाटते...; अमित शाह यांचा हल्लाबोल

नोटा मोजता-मोजता मशिन गरम होतायत अन् विरोधी पक्षांच्या नेत्यांना वाटते...; अमित शाह यांचा हल्लाबोल

नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून काळ्या पैशांवर कठोरतेने कारवाई झाली आहे. ईडी काळ्या पैशांवर कारवाई करत आहे. ईडीने जेवढी संपत्ती जप्त केली आहे, त्यांतील केवळ 5 टक्के संपत्तीच राजकीय पक्षांशी संबंधित लोकांची आहे. उर्वरित 95 टक्के काळा पैसा असलेले लोक आहेत, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे. ते आज CNN News18 च्या रायजिंग भारत समिटमध्ये बोलत होते. यावेळी त्यांना नेत्यांच्या घरांवरील ईडी, सीबीआय आणि इनकम टॅक्‍स डिपार्टमेंटच्या छाप्यांसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी त्यांनी विरोधकांवर थेटे हल्ला चढवला.

अमित शाह म्हणाले, ‘राजकीय नेत्यांविरोधात कारवाईच होऊ नये, असे विरोधी पक्षांना वाटते. मात्र मी स्‍पष्‍टपणे सांगू इच्छितो की, 95 टक्के कारवाया अशा लोकांविरोधात झाल्या आहेत, ज्यांचा राजकारणाशी काही संबंधच नाही.’ यावेळी शाह यांनी ममता बॅनर्जी सरकारमधील एका मंत्र्याच्या घरावर झालेल्या कारवाईचा उल्लेख केला. ते म्हणाले, "ममता बॅनर्जी सरकारमधील एका मंत्र्याच्या घरावर टाकण्यात आलेल्या धाडीत 55 कोटी रुपये मिळाले आहेत. तर, एका कारवाईत काँग्रेसच्या एका खासदाराच्या घरातून 355 कोटी रुपये मिळाले. एसबीआयच्या 10 मशिन नोटा मोजता-मोजता थकल्या, गरम झाल्या. तरीही कारवाई होऊ नये, असे विरोधी पक्षांच्या नेत्यांना वाटते."

‘जप्त केलेला पैसा कुणाचा, हे विरोधी पक्ष सांगू शकतो का? -
अमित शाह म्हणाले, "छाप्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करू नका. मोठा प्रश्न असा आहे की, काँग्रेसच्या खासदाराकडे 350 कोटी आणि ममता बॅनर्जींच्या मंत्र्याकडे 55 कोटी रुपये कुठून आले? नोटांचे बंडल भरण्यासाठी मॅटाडोर आणावा लागला. एक मॅटाडोर कमी पडला, म्हणून पहाटे 4 वाजता नोटा भरण्यासाठी दुसरा मॅटाडोर आणावा लागला. जनता सर्व काही बघत आहे, हे विरोधक विसरत आहेत. हा पैसा कुठे जाणार होता? हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी देशातील जनतेला सांगू शकतील का? एवढेच नाही, तर त्यांच्या खासदाराच्या घरातून जप्त करण्यात आलेले 355 कोटी रुपये कुणाचे आहेत? याचे उत्तरही त्यांनी द्यायला हवे," असेही शाह यावेळी म्हणाले.

Web Title: The counting machine heats up Leaders of opposition parties feel that no action should be taken Direct attack congress rahul gandhi and tmc by Amit Shah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.