शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

"संविधानामुळेच आपला देश संकटकाळातही एकसंध"; सरन्यायाधीश भूषण गवई यांचे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 12:10 IST

शांतता आणि युद्ध दोन्ही काळात ठेवले मजबूत!

प्रयागराज: देशावर जेव्हा जेव्हा संकट आले, तेव्हा तेव्हा संविधानामुळे देश एकत्र आणि मजबूत राहिला आहे, असे भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी शनिवारी सांगितले. येथे इलाहाबाद उच्च न्यायालयात अधिवक्ता चेंबर्स आणि मल्टी-लेव्हल पार्किंगच्या उद्घाटनानंतर आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी गवई म्हणाले की, जेव्हा संविधान तयार केले जात होते, अंतिम मसुदा घटना समितीसमोर सादर केला गेला, तेव्हा काही लोक म्हणत होते की, हे संविधान खूप फेडरल आहे, तर काही म्हणत होते की, खूप एकात्मक आहे. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उत्तर दिले की, संविधान पूर्णपणे फेडरल नाही, पूर्णपणे एकात्मकही नाही. आम्ही असे संविधान दिले आहे जे भारताला शांती आणि युद्ध या दोन्ही काळात एकत्र आणि मजबूत ठेवेल.

गवई असेही म्हणाले की, मी नेहमी सांगतो की, बार आणि बेंच या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. जोवर बार व बेंच एकत्र काम करीत नाहीत, तोपर्यंत न्यायाचा रथ पुढे जाऊ शकत नाही.

‘मूलभूत रचनेत बदलाचे अधिकार संसदेला नाहीत’

यावेळी सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले की, १९७३ मध्ये १३ न्यायाधीशांच्या खंडपीठाने निर्णय दिला की संसदेला संविधानात दुरुस्ती करण्याचा अधिकार आहे आणि यासाठी ती मूलभूत अधिकारांमध्ये दुरुस्ती करू शकते; पण, संविधानाच्या मूलभूत रचनेत बदल करण्याचा अधिकार संसदेला नाही. त्यावेळी या खंडपीठाने असेही सांगितले की, मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्त्वे दोन्ही संविधानाची आत्मा आहेत. ही दोन्ही तत्त्वे म्हणजे संविधानाच्या सुवर्ण रथाची दोन चाके आहेत. यातील एक चाक जरी थांबले तर संपूर्ण रथ थांबतो. 

त्यामुळेच विकासमार्गावर

स्वातंत्र्यानंतर भारत आता विकासाच्या मार्गावर आहे, हे संविधानामुळे शक्य झाले आहे. आज आपण आपल्या शेजारी देशांची स्थिती पाहतो. पण, भारत स्वतंत्र झाल्यानंतर विकासाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. संविधान लागू होऊन ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. या काळात विधीमंडळ, कार्यकारी आणि न्यायपालिका यांनी सामाजिक, आर्थिक समानता निर्माण करण्यात मोठे योगदान दिले आहे, असे सरन्यायाधीश म्हणाले.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयConstitution Dayसंविधान दिन