"संविधान घरावर हल्ला करण्याची परवानगी देत नाही..."; राणा सांगा यांच्या संदर्भात निर्माण झालेल्या वादावरून खर्गेंचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 13:37 IST2025-03-28T13:37:16+5:302025-03-28T13:37:54+5:30

समाजवादी पक्षाचे खासदार रामजी लाल सुमन यांनी राणा सांगा यांच्यासंदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानावरून राज्यसभेत गदारोळ सुरू आहे. या विधानानंतर, रामजी लाल सुमन यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यावरून विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी नाराजी व्यक्त करत संविधान याला परवानगी देत नाही, असे म्हटले आहे.

The Constitution does not allow attack on homes Kharge's statement over the controversy about Rana Sanga ramji lal suman | "संविधान घरावर हल्ला करण्याची परवानगी देत नाही..."; राणा सांगा यांच्या संदर्भात निर्माण झालेल्या वादावरून खर्गेंचं विधान

"संविधान घरावर हल्ला करण्याची परवानगी देत नाही..."; राणा सांगा यांच्या संदर्भात निर्माण झालेल्या वादावरून खर्गेंचं विधान

समाजवादी पक्षाचे खासदार रामजी लाल सुमन यांनी राणा सांगा यांच्यासंदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानावरून राज्यसभेत गदारोळ सुरू आहे. या विधानानंतर, रामजी लाल सुमन यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यावरून विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी नाराजी व्यक्त करत संविधान याला परवानगी देत नाही, असे म्हटले आहे. तसेच, आम्ही महाराणा प्रताप, राणा सांगा आणि देशासाठी आपले प्राण देणाऱ्या देशाच्या इतर भागांतील लोकांचाही सन्मान करतो," असेही खर्गे म्हणाले.

तत्पूर्वी, यासंदर्भात बोलताना संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू म्हणाले होते, या सभागृहात जर कुणी देशाच्या महानायकांचा अपमान करत असेल... हा मुद्दा केवळ सूमन यांचाच आहे, असे मी मानत नाही. ते वरिष्ठ नेते आहेत, मात्र, त्यांनी राणा सांगा यांच्या संदर्भात जे भाष्य केले आहे, ते भलेही संसदेच्या कामकाजातून काढले असेल, पण सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांचे हे विधान कसे कुणी स्वीकारू शकेल. यामुळे, I.N.D.I.A. आणि काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांचे हे विधान फेटाळावे, असे मी म्हणतो."

"खासदाराच्या घरावरील हल्ल्याचा निषेध करतो" - 
संसदीय कामकाज मंत्री रिजिज्यू यांच्या विधानावर बोलताना मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, "आपण जे बोलला आहात, आम्ही त्याचे स्वागत करतो. या देशात जे देशभक्त आहेत, देशासाठी लढले आहेत, मी त्यांचा आदर करतो. मात्र, कायदा हातात घेऊन, जर कुणी कुणाच्या घरावर हल्ला करत असेल, तोडफोड करत असेल, जर कुणी त्याच्या संपत्तीचे नुकसान करत असेल, तर हे आम्हाला मान्य नाही. मी याचा निषेध करतो. सभापती जी, आपल्या म्हणण्याशी आम्ही सहमत आहोत. मात्र, यांनी तो मुद्दा उपस्थित करत तोडफोड केली. त्यांच्या वाहनाचे नुकसान केले. हे अपमानास्पद दलितांविरोधात जे सुरू आहे, ते आम्ही कदापी सहन करणार नाही."

Web Title: The Constitution does not allow attack on homes Kharge's statement over the controversy about Rana Sanga ramji lal suman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.