शस्त्रसंधीला एक्सपायरी डेट नाही, लष्कराने केली घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 09:52 IST2025-05-19T09:52:12+5:302025-05-19T09:52:31+5:30
‘ऑपरेशन सिंदूर’ तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे, असे देशातील काही नेतेमंडळी वारंवार सांगत होती. त्यातच, १८ मेपर्यंतच शस्त्रसंधी राहणार आहे आणि त्यानंतर भारतासोबत पुन्हा चर्चा होईल, असे पाकिस्तानकडून सांगितले जात होते. त्यामुळे सीमावर्ती भागांतील नागरिक धास्तावले होते.

शस्त्रसंधीला एक्सपायरी डेट नाही, लष्कराने केली घोषणा
जम्मू : भारत आणि पाकिस्तान दरम्यान १० मेपासून सुरू झालेल्या शस्त्रसंधीची कोणतीही समाप्ती तारीख (एक्स्पायरी डेट) नाही व यावर पाकिस्तानसोबत आता कोणतीही चर्चा होणार नाही, असे भारतीय लष्कराने रविवारी स्पष्ट केले. यामुळे सीमावर्ती भागांतील लाखो नागरिकांच्या जीवात जीव आला आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’ तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे, असे देशातील काही नेतेमंडळी वारंवार सांगत होती. त्यातच, १८ मेपर्यंतच शस्त्रसंधी राहणार आहे आणि त्यानंतर भारतासोबत पुन्हा चर्चा होईल, असे पाकिस्तानकडून सांगितले जात होते. त्यामुळे सीमावर्ती भागांतील नागरिक धास्तावले होते.
डीजीएमओंची बैठक होणारच नव्हती...
भारतीय लष्कराने स्पष्ट केले की, भारत आणि पाकिस्तानच्या लष्करी कारवाया महासंचालकांमध्ये (डीजीएमओ) रविवारी कोणतीही बैठक होणार नव्हती. शस्त्रसंधी तात्पुरती आहे आणि रविवारी ती संपणार आहे, ही बाब फेटाळून लावताना लष्कराच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, शस्त्रसंधीला कोणतीही समाप्ती तारीख नाही.
१२ मे रोजी भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओत महत्त्वाची चर्चा झाली. त्यात सीमा क्षेत्रांमधून गोळीबार किंवा अन्य आक्रमक हालचाली टाळण्यावर सहमती झाली होती.