शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

"ती छेडछाड खरी नव्हती, स्वप्न होतं...!" ७ वर्षांनंतर मेहुणीनं कोर्टात सांगितलं सत्य, हवाई दलाचा कर्मचारी निर्दोष मुक्त; वाचा संपूर्ण प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 13:59 IST

या आरोपांमुळे एअरफोर्स कर्मचाऱ्याला १९ दिवस तुरुंगवासही झाला होता.

एका अल्पवयीन मेहुणीने आपल्या मेहुण्यावर लावलेला विनयभंगाचा आरोप तब्बल ७ वर्षांनंतर खोटा सिद्ध झाला आहे. "ती घटना प्रत्यक्षात घडली नाही, तर ते एक स्वप्न होते," असे मेहुणीने न्यायालयात सांगितल्यानंतर विशेष न्यायाधीशांनी संबंधित एअरफोर्स कर्मचाऱ्याची निर्दोष मुक्तता केली आहे.

प्रकरणाची पार्श्वभूमी:उत्तर प्रदेशातील बिठूर येथील रहिवासी असलेल्या आणि सध्या पुण्यात कॉर्पोरल पदावर तैनात असलेल्या या एअरफोर्स कर्मचाऱ्याचा विवाह फेब्रुवारी २०१९ मध्ये झाला होता. लग्नानंतर पत्नीला माहेरून आणण्यासाठी तो सासरी गेला होता. तेथून पत्नीला आणताना त्यांच्यासोबत एक १५ वर्षीय मेहुणीही आली होती. ८ मार्च २०१९ च्या रात्री ९ वाजता ही मुलगी अचानक ओरडू लागली. तिने आपल्या मेहुण्याने विनयभंग केल्याचा आरोप केला. यानंतर, तिच्या वडिलांनी नौबस्ता पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या आरोपांमुळे एअरफोर्स कर्मचाऱ्याला १९ दिवस तुरुंगवासही झाला होता.

कोर्टात काय घडलं...? -डिसेंबर २०२१ मध्ये न्यायालयात साक्ष देताना पीडितेने सांगितले की, "त्या रात्री मी अँटीबायोटिक औषध घेऊन झोपले होते. झोपेत मला स्वप्न पडले की जीजूने मला पकडले आहे. त्यामुळे मी आरडाओरडा केला. पण ते केवळ स्वप्न होते. प्रत्यक्षात असे काहीही घडले नव्हते." पीडितेच्या वडिलांनी आणि मोठ्या बहिणीने देखील केवळ भ्रमातून हा गुन्हा दाखल केल्याची कबुली न्यायालयात दिली.

वरिष्ठ अधिवक्ता करीम अहमद सिद्दीकी यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्तीवर लैंगिक हल्ला आणि मारहाणीचे आरोप निश्चित करण्यात आले होते. मात्र, पीडितेच्या या ताज्या बयानानंतर न्यायालयाने पुराव्यांअभावी एअरफोर्स कर्मचाऱ्याला सर्व आरोपातून निर्दोष मुक्त केले.

 

English
हिंदी सारांश
Web Title : False Molestation Claim: Sister-in-law's Dream Exonerates Air Force Employee

Web Summary : Seven years after a molestation accusation, the sister-in-law admitted it was a dream. An Air Force employee, imprisoned for 19 days, was acquitted due to lack of evidence after the accuser, her father, and sister confessed to the misunderstanding in court.
टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCourtन्यायालयMolestationविनयभंग