शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
2
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
3
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
4
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
5
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
6
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
7
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
8
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
9
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
10
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
11
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
12
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
13
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
14
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
15
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
16
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
17
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
18
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
19
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
20
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
Daily Top 2Weekly Top 5

अभूतपूर्व विजयासाठी ममता दिदींनी मानले मतदारांचे आभार

By admin | Updated: May 19, 2016 12:35 IST

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसने पुन्हा एकदा बाजी मारत राज्यात निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे.

ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. १९ - पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसने पुन्हा एकदा बाजी मारत राज्यात निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे. पाच वर्षांपूर्वी बंगालच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या ममता दिदींना यावेळीही मतदारांनी भरघोस साथ दिलू असून तृणमूलने २९५ पैकी २१८ जागांवर आघाडी घेत डावे व काँग्रेसच्या आघाडीला जोरदार धक्का दिला. या अभूतपूर्व विजयाबद्दल ममता दीदींनी बंगालच्या मतदारांचे आभार मानले आहेत. 
( इथे पाहा २०१६ विधानसभा निवडणूक निकाल)
 
' हा मोठा विजय मिळवून दिल्याबद्दल मी पश्चिम बंगालच्या मतदारांचे खूप आभार मानते. बंगालच्या जनतेची दिशाभूल करण्यात आली तसेच विरोधकांनी त्यांना घाबरवण्याचाही प्रयत्न केला. मात्र जनतेने शांततेत मतदान करून आपला कौल कोणाला आहे ते स्पष्ट केले' अशी प्रतिक्रिया ममता यांनी विजयानंतर व्यक्त केली. ' गेल्या दोन वर्षांपासून आमच्याविरोधात खूप अपप्रचार करण्यात आला, आमच्यावर अनेक आरोप करण्यात आले.  मात्र मतदारांनी त्याकडे दुर्लक्ष करून, ते आरोप नाकारून, आम्हाला दणदणीत विजय मिळवून दिला यासाठी मी त्यांचे आभार मानते. यावेळी आम्ही एकट्याने लढा दिला,' असेही त्या म्हणाल्या. पश्चिम बंगाल हे भ्रष्टाचारमुक्त राज्य असल्याचा दावाही बॅनर्जी यांनी यावेळी केला. 
दरम्यान गेल्या निवडणुकीत तृणमूलचे १८४ आमदार विजयी झाले होते, यावेळेस मात्र तृणमूलने जोरदार आघाडी घेतल्याने आता प.बंगाल विधानसभेत तृणमूलचे २०० हून अधिक शिलेदार असतील, असेच चित्र दिसत आहे.