जम्मू काश्मीर : रुग्णालयात गोळीबार करत दहशतवाद्यांचं पाकिस्तानी कैद्यासोबत पलायन; एक पोलीस शहीद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2018 13:54 IST2018-02-06T12:20:56+5:302018-02-06T13:54:38+5:30

श्रीनगरच्या श्री महाराजा हरी सिंग रुग्णालयात मंगळवारी सकाळी दहशतवाद्यांनी शिरून गोळीबार केला

Terrorists fire shots inside Shri Maharaja Hari Singh hospital in Srinagar | जम्मू काश्मीर : रुग्णालयात गोळीबार करत दहशतवाद्यांचं पाकिस्तानी कैद्यासोबत पलायन; एक पोलीस शहीद

जम्मू काश्मीर : रुग्णालयात गोळीबार करत दहशतवाद्यांचं पाकिस्तानी कैद्यासोबत पलायन; एक पोलीस शहीद

श्रीनगर: श्रीनगरच्या श्री महाराजा हरी सिंह रुग्णालयात मंगळवारी सकाळी दहशतवाद्यांनी शिरून गोळीबार केला. या गोळीबारानंतर दहशतवादी फरार झाले आहेत. यावेळी रुग्णालयात असणाऱ्या पोलिसांनी दहशतवाद्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. तेव्हा दहशतवाद्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले. यातील एका पोलिसाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.   

प्राथमिक माहितीनुसार आज पोलिसांकडून नावेद या पाकिस्तानी कैद्याला महाराजा हरी सिंह रुग्णालयात तपासणीसाठी आणण्यात आले होते. त्यावेळी दहशतवाद्यांनी रुग्णालयात घुसून अंदाधुंद गोळीबार सुरू केला. याचा फायदा घेऊन नावेदने तेथून पळ काढला. त्यामागोमाग दहशतवादीही तेथून पसार झाले. 



 



 



 

Web Title: Terrorists fire shots inside Shri Maharaja Hari Singh hospital in Srinagar