शहरं
Join us  
Trending Stories
1
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
2
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
3
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
4
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
5
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
6
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
7
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
8
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
9
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
10
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
11
नागरिकत्व नियमांमध्ये मोठे बदल! अल्पवयीन मुलांसाठी पासपोर्टचे नियम अधिक कडक, OCI नोंदणी ऑनलाइन
12
'ये जवानी है दिवानी' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार; म्हणाली...
13
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटवर मोठी कारवाई, ३४९ किलो हाय-ग्रेड कोकेन पकडले, किंमत हजारो कोटींमध्ये 
14
बजाजचा बाजारात धमाका! नवीन Pulsar NS400Z लॉन्च; किंमत झाली कमी अन् फीचर्समध्येही तडजोड नाही
15
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
16
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
17
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
18
राजश्री देशपांडेने आत्मविश्वासाने दाखवल्या ब्रेस्ट कॅन्सरच्या खुणा, फोटो शेअर करत म्हणाली...
19
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
20
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
Daily Top 2Weekly Top 5

अतिरेक्यांनी केली एस. टी. बस ‘हायजॅक’ एस. टी. स्टॅण्डमधील थरार : एटीएसच्या पथकाने केली प्रवाशांची सुटका

By admin | Updated: September 4, 2015 21:54 IST

सोलापूर : दुपारची वेळ एस.टी. स्टॅण्ड परिसरातील बार्शी स्थानकावर थांबलेल्या बसमध्ये दोन अतिरेकी घुसले. रायफलचा धाक दाखवून पूर्ण ताबा मिळवला. काय होतंय हे कळायच्या आत फायरिंग केल्याने आपली बस अतिरेक्यांनी हायजॅक केल्याचे प्रवाशांच्या लक्षात आले. बघता बघता ही बातमी वार्‍यासारखी एस. टी. स्टॅण्ड परिसरात पसरली आणि एकच खळबळ उडाली. ही बातमी पोलीस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षाला समजली, एस. टी. बसस्थानकाच्या संरक्षक भिंतीवरून चार, प्रवेशद्वारातून चार, पाठीमागील प्रवेशद्वारातून चार अशा गटागटाने एटीएसच्या जवानांनी बसला वेढले आणि मोठय़ा शिताफीने अतिरेक्यांना ताब्यात घेऊन प्रवाशांची सुखरूप सुटका केली. हा सर्व प्रकार मॉक डेमोस्ट्रेशन (प्रात्यक्षिक) असल्याचे समजताच एस. टी. स्टॅण्ड परिसरातील नागरिकांचा जीव मात्र भांड्यात पडला.

सोलापूर : दुपारची वेळ एस.टी. स्टॅण्ड परिसरातील बार्शी स्थानकावर थांबलेल्या बसमध्ये दोन अतिरेकी घुसले. रायफलचा धाक दाखवून पूर्ण ताबा मिळवला. काय होतंय हे कळायच्या आत फायरिंग केल्याने आपली बस अतिरेक्यांनी हायजॅक केल्याचे प्रवाशांच्या लक्षात आले. बघता बघता ही बातमी वार्‍यासारखी एस. टी. स्टॅण्ड परिसरात पसरली आणि एकच खळबळ उडाली. ही बातमी पोलीस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षाला समजली, एस. टी. बसस्थानकाच्या संरक्षक भिंतीवरून चार, प्रवेशद्वारातून चार, पाठीमागील प्रवेशद्वारातून चार अशा गटागटाने एटीएसच्या जवानांनी बसला वेढले आणि मोठय़ा शिताफीने अतिरेक्यांना ताब्यात घेऊन प्रवाशांची सुखरूप सुटका केली. हा सर्व प्रकार मॉक डेमोस्ट्रेशन (प्रात्यक्षिक) असल्याचे समजताच एस. टी. स्टॅण्ड परिसरातील नागरिकांचा जीव मात्र भांड्यात पडला.
देशातील अतिरेकी कारवाईच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने एस. टी. स्टॅण्ड परिसरात मॉक डेमोस्ट्रेशन (प्रात्यक्षिक) घेण्यात आले. या कारवाईत दहशतवादीविरोधी पथक, जलद प्रतिसाद पथक (क्यु.आर.टी.), दंगानियंत्रण पथक (आर.सी.पी) च्या 46 जवानांनी सहभाग घेतला होता. एटीएसमधील दोन पोलीस कर्मचारी रायफल घेऊन एस. टी. बसमध्ये घुसतात. एस. टी. चालक व वाहकासह सर्व प्रवाशांना रायफलीच्या धाकाने ताब्यात घेतले. प्रवाशांनी आरडाओरड केली मात्र रायफलमधून फायरिंग केल्याने सर्वांचा आवाज बंद झाला. फायरिंगमुळे आतमध्ये काहीतरी गडबड सुरू आहे हे स्थानकावरील अन्य प्रवाशांच्या लक्षात आले. सर्वत्र पळापळ सुरू झाली आणि याची माहिती नियंत्रण कक्षाला मिळाली. अवघ्या काही मिनिटात एटीएस, क्युआरटी, आर.सी.पी.चे जवान संपूर्ण तयारीनिशी दाखल झाले. अतिरेक्यांना कसलीही संधी न देता बसला वेढतात आणि अतिरेक्यांवर रायफल रोखली.
अतिरेक्यांचा प्रयत्न हाणून पाडत ‘एटीएस’ पथकातील जवान बसमध्ये घुसले. अतिरेक्यांची रायफल काढून घेऊन त्यांना बाहेर काढले. सर्व प्रवाशांना बाहेर काढून जमिनीवर बसवले, सर्वांची तपासणी करून प्रवाशीच आहेत का, हे पाहिले. यातील दोनच अतिरेकी असल्याचे लक्षात आल्याने त्यांना हाथ वर करून जमिनीवर बसवण्यात आले. त्यांच्या खिशातील मोबाईल, पाकीट आदी साहित्य काढून घेतले. बाहेरून हल्ला झाला तर त्याला रोखण्यासाठी दोन अतिरेक्यांनी एस.टी.च्या टफावर बसून रायफल रोखली. अतिरेक्यांना पोलिसांच्या गाडीत बसवून घेऊन गेले. अशा पद्धतीने प्रवाशांची अतिरेक्यांच्या तावडीतून सुटका केली. या प्रात्यक्षिकप्रसंगी र. पोलीस निरीक्षक अंकुश यादव, फौजदार एस. डी. चवरे, वाहतूक शाखेचे फौजदार रवींद्र भंडारे आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)
कोट..
अतिरेकी कारवायांच्या पार्श्वभूमीवर एस. टी. स्टॅण्ड परिसरात असा प्रकार घडला तर कशा पद्धतीने सामना करावा लागेल आणि प्रवाशांचे संरक्षण होईल याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले आहे. देशभरात कोठेही असा प्रसंग होऊ शकतो, त्यासाठी सतर्कता म्हणून हे प्रात्यक्षिक घेण्यात आले आहे.
अंकुश यादव, र. पोलीस निरीक्षक