शहरं
Join us  
Trending Stories
1
"जगात असा एकही देश नाही, जेथे...!"; डच पंतप्रधानांच्या 'चिंते'ला भारताचं सडेतोड उत्तर
2
लालपरीचा प्रवास महाग होणार का? एसटी तिकीट दराबाबत मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली महत्वाची माहिती
3
ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली असती तर TMC ला किती जागा मिळाल्या असत्या? आकडे बघून थक्क व्हाल
4
MLC Election Maharashtra: महाराष्ट्रात पुन्हा निवडणूक! विधान परिषदेच्या १६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर; पाहा संपूर्ण वेळापत्रक
5
Top Marathi News LIVE: ट्रक-व्हॅनचा भीषण अपघात, १० प्रवाशांचा मृत्यू, मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश
6
Adhik Maas 2026: विनायक चतुर्थीला अंगारक योग, ‘असे’ करा गणपती व्रत पूजन; दुपटीने शुभ-लाभ!
7
Travel : पैशांपेक्षा आनंदाला महत्त्व देणारा जगातील एकमेव देश! आयुष्यात एकदा तरी भेट द्यायलाच हवी
8
लखीमपूर खिरीत भीषण अपघात; ट्रक आणि मॅजिकची जोरदार धडक, १० जणांचा मृत्यू, ४ जखमी
9
नाकात नथ अन् कपाळी चंद्रकोर! कान्समध्ये अवतरली मदनमंजिरी, प्राजक्ता माळीने नऊवारीत दाखवला मराठी ठसका
10
Twisha Sharma: 'मी अडकलेय रे, पण तू अडकू नकोस', ट्विशाचा मीनाक्षीला मेसेज, त्यानंतर मृत्यूचीच बातमी आली; असं काय घडलं?
11
बचत करताना 'हे' लक्षात ठेवा, नाहीतर कष्टाची कमाई 'अशी' होईल बरबाद!
12
बेपत्ता मुलीच्या कुटुंबाच्या विनवण्या, पोलीस अधिकारी म्हणाले शोधण्यासाठी गाडीत 'डिझेल'च नाही; नागपूरमधील धक्कादायक प्रकार
13
Safest Cars: किया सेल्टोस ते टाटा पंच...,भारतातील सुरक्षित गाड्या; क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार!
14
अशोक सराफ यांचा मुलगा अनिकेतही कान्समध्ये पोहोचला, आईचा फोटो शेअर करत म्हणाला...
15
'राजा शिवाजी' ठरला ब्लॉकबस्टर! १०० कोटी कमावणारा मराठीतला दुसरा सिनेमा, 'सैराट'चा विक्रम मोडणार?
16
"दीपिकाच्या शरीरावर जखमांच्या खुणा, हुंड्यासाठी केली हत्या"; काकांचा खळबळजनक दावा
17
इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये चूक झाल्यास आता डिलीट करायची झंझट मिटली; कंपनीने आणले भन्नाट 'Edit' फीचर!
18
Pavala Shyamala : ग्लॅमरच्या दुनियेतून थेट रस्त्यावर; पैसे नसल्यामुळे ज्येष्ठ अभिनेत्रीला रुग्णालयाने नाकारले उपचार
19
Fact Check: विश्वास नांगरे पाटील यांच्याबाबतचे 'ते' क्रिएटिव्ह FAKE; 'लोकमत'चे नाव आणि लोगो वापरून दिशाभूल
20
गोरखपूर इंजिनिअर मृत्यू प्रकरण; नवऱ्याला मृत्यूच्या दारात ढकलणारी 'ती' क्रूर पत्नी अखेर गजाआड
Daily Top 2Weekly Top 5

अबू आझमींसोबत दहशतवाद्याचे संबंध

By admin | Updated: May 6, 2014 15:41 IST

समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांच्याशी आपले संबंध असल्याची जबानी इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा सदस्य सुलतान अहमद फैझान याने दिल्याने अबू आझमी अडचणीत येण्याची शक्यता आहे.

मुंबई : समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांच्याशी आपले संबंध असल्याची जबानी इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा सदस्य सुलतान अहमद फैझान याने दिल्याने आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी नेहमी चर्चेत राहणारे अबू आझमी अडचणीत येण्याची शक्यता आहे. फैझान याला दोन महिन्यांपूर्वी दुबईत अटक करून दिल्लीत आणण्यात आले होते.
सुरक्षा यंत्रणांनी फैझानच्या भारतातील काही नेत्यांशी असलेल्या संबंधांबाबत चौकशी केली असता १९८0 साली स्थापन केलेल्या प्लेसमेंट एजन्सीमध्ये अबू आझमी आपला सहकारी असल्याचे फैझानने पोलिसांना सांगितले आहे. नोकरीसाठी भारतातून दुबईमध्ये कामगार पाठवण्याचे काम या एजन्सीमार्फत केले जात होते.
फैझान मूळचा उत्तर प्रदेशमधील आझमगडचा रहिवासी असून, अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम आणि अबू आझमी हे देखील आझमगडचेच राहणारे आहेत. त्यामुळे फैझानचे अबू सालेम आणि अबू आझमी या दोघांसोबत जवळचे संबंध होते. २00८ साली दिल्लीत झालेल्या साखळी स्फोटांमागे पाकिस्तानमधील सूत्रधारांच्या संपर्कात राहणार्‍या फैझानचा हात होता. तसेच फैझान इंडियन मुजाहिदीनच्या दहशतवाद्यांना आसरा देण्याचे तसेच या संघटनेला आर्थिक पाठबळ देण्याचे काम करीत होता, असा पोलिसांचा आरोप आहे.