इस्कॉन ब्रीजवर भीषण अपघात, ९ जणांचा मृत्यू अनेक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 06:53 AM2023-07-20T06:53:08+5:302023-07-20T06:53:36+5:30

महिंद्रा थार गाडी रात्री १ वाजताच्या सुमारास ट्रकला धडकली, या अपघातातील जखमींच्या मदतीसाठी लोक एकत्र जमा झाले होते.

Terrible accident on ISKCON bridge of ahmedabad, 9 dead, many injured | इस्कॉन ब्रीजवर भीषण अपघात, ९ जणांचा मृत्यू अनेक जखमी

इस्कॉन ब्रीजवर भीषण अपघात, ९ जणांचा मृत्यू अनेक जखमी

googlenewsNext

अहमदाबाद - गुजरातच्या अहमदाबाद येथे मोठी दुर्घटना घडली असून भीषण अपघातात ९ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अहमदाबादच्या एसजी महामार्गावरील इस्कॉन पुलावर हा भीषण अपघात झाला. जॅग्वार कारने पुलावरील लोकांना चिरडले, त्यात ९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मृतांमध्ये १ पोलीस शिपाई व एक होमगार्ड यांचाही समावेश असून आणखी काही जखमी झाले आहेत. 

महिंद्रा थार गाडी रात्री १ वाजताच्या सुमारास ट्रकला धडकली, या अपघातातील जखमींच्या मदतीसाठी लोक एकत्र जमा झाले होते. त्याचवेळी अंदाजे १२० च्या गतीने आलेल्या जॅग्वार कारने पुलावरील लोकांना उडवले. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.  

Web Title: Terrible accident on ISKCON bridge of ahmedabad, 9 dead, many injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.