टिहरीमध्ये भीषण अपघात! भाविकांनी भरेलेली बस दरीत कोसळली; 5 जणांचा मृत्यू, 13 जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 15:03 IST2025-11-24T15:03:18+5:302025-11-24T15:03:46+5:30
सर्व भाविक कुंजापुरी मंदिर दर्शनासाठी जात होती.

टिहरीमध्ये भीषण अपघात! भाविकांनी भरेलेली बस दरीत कोसळली; 5 जणांचा मृत्यू, 13 जखमी
टिहरी (उत्तराखंड)- जिल्ह्यातील नरेंद्रनगर परिसरात सोमवारी(दि.24) मोठा अपघात घडला. कुंजापुरी-हिंडोलाखाल मार्गावर प्रवासी बस खोल दरीत कोसळली, ज्यात 5 भाविकांचा मृत्यू झाला, तर 13 जण गंभीर जखमी झाले आहेत. ही बस गुजरातमधील भाविकांना घेऊन कुंजापुरी मंदिर दर्शनासाठी जात होती.
घटना कशी घडली?
स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, भाविकांनी भरलेली बस कुंजापुरी मंदिराच्या दिशेने जात असताना अचानक अनियंत्रित झाली आणि सुमारे 70 मीटर खोल दरीत कोसळली. अपघाताची माहिती मिळताच SDRF व पोलीस-प्रशासनाच्या टीम्स घटनास्थळी दाखल झाल्या.
टिहरी के नरेंद्रनगर कुंजापुरी मंदिर के समीप हुई बस दुर्घटना का समाचार अत्यंत दुःखद है, ईश्वर से प्रार्थना है कि दिवंगतों को श्रीचरणों में स्थान और शोकाकुल परिजनों को यह असीम दुःख सहन करने की शक्ति प्रदान करें।
— Pushkar Singh Dhami (@pushkardhami) November 24, 2025
हादसे में घायलों को जिला प्रशासन और SDRF द्वारा नजदीकी अस्पताल भेजा…
मृत व जखमींची संख्या
सुरुवातीला बसमध्ये 28 प्रवासी असल्याचे सांगितले जात होते, मात्र टिहरीचे मुख्य वैद्यकीय अधिकारी (CMO) श्याम विजय यांनी दिलेल्या माहितीनुसार बसमध्ये एकूण 18 प्रवासी होते. त्यापैकी 5 जणांचा मृत्यू, तर 13 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी तीन जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना एम्स ऋषिकेश येथे हलविण्यात आले आहे, तर उर्वरित दहा जणांवर नरेंद्रनगर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. आपल्या शोक संदेशात त्यांनी म्हटले की, “टिहरीतील बस दुर्घटना अत्यंत वेदनादायी आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले असून, आम्ही स्थानिक प्रशासनाच्या सतत संपर्कात आहोत. देवाकडे जखमींची प्रकृती लवकर सुधारण्यासाठी प्रार्थना करतो.”