दिल्लीतील विजय चौकात भीषण अपघात; दोन सुसाट कारची समोरासमोर धडक, एक उलटली - बघा VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 01:17 IST2026-02-14T01:16:42+5:302026-02-14T01:17:25+5:30

सुदैवाने, या अपघातात कुणालाही इजा झाली नाही.

Terrible accident at Vijay Chowk in Delhi; Two cars collide head-on, one overturns Watch VIDEO | दिल्लीतील विजय चौकात भीषण अपघात; दोन सुसाट कारची समोरासमोर धडक, एक उलटली - बघा VIDEO

दिल्लीतील विजय चौकात भीषण अपघात; दोन सुसाट कारची समोरासमोर धडक, एक उलटली - बघा VIDEO

विजय चौक परिसर हा राजधानी दिल्लीतील एक अत्यंत महत्वाचा परिसर म्हणून ओळखला जातो. या परिसरात शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमार भरधाव कारचा भीषण अपघात झाला. दोन भरधाव कार एकमेकींवर समोरासमोर धडकल्या. हा अपगात एवढा भीषण होता की, यांपैकी एक कार रस्त्यावरच पलटली आणि दुसऱ्या कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सुदैवाने, या अपघातात कुणालाही इजा झाली नाही.

अपघाताचा थरार -
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही कार वेगवेगळ्या दिशेने अतिशय वेगात येत होत्या. विजय चौकात पोहोचताच चालकांचे नियंत्रण सुटले आणि दोन्ही कार समोरासमोर एकमेकांना धडकल्या. या धडक एक कार उलटली, तर दुसरीचे मोठे नुकसान झाले. विशेष म्हणजे, दोन्ही वाहनांमध्ये केवळ चालकच होते. ते या भीषण अपघातानंतर कारमधून सुरक्षित बाहेर पडले. अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

अपघातानंतरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल -
या अपघातानंतरचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक कार पूर्णपणे उलटलेली दिसत असून, दुसऱ्या कारचा समोरून चक्काचूर झाल्याचे दिसत आहे.

 

वाहतूक पूर्ववत -
घटनेची माहिती मिळताच ट्रॅफिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही अपघातग्रस्त वाहने बाजूला केली आणि विस्कळीत झालेली वाहतूक पूर्ववत केली. सध्या संसद मार्ग पोलीस ठाण्याकडून या प्रकरणाचा अधिक तपास केला जात असून, अतिवेगामुळे हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे.
 

Web Title : दिल्ली: विजय चौक पर भीषण दुर्घटना; कारों की टक्कर, एक पलटी

Web Summary : दिल्ली के विजय चौक पर एक बड़ी कार दुर्घटना हुई। दो तेज रफ्तार कारों की आमने-सामने टक्कर हो गई, जिससे एक कार पलट गई। सौभाग्य से, कोई घायल नहीं हुआ। पुलिस जांच कर रही है, और गति को कारण मान रही है।

Web Title : Delhi: Major Accident at Vijay Chowk; Cars Collide, One Overturns

Web Summary : A major car accident occurred at Vijay Chowk in Delhi. Two speeding cars collided head-on, resulting in one car overturning. Fortunately, no injuries were reported. Police are investigating, suspecting speeding as the cause.