बिहारमध्ये ताप्ती-गंगा एक्स्प्रेसचे तेरा डबे घसरले, चार जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2019 12:14 IST2019-03-31T10:53:07+5:302019-03-31T12:14:45+5:30

बिहारमध्ये ताप्ती-गंगा एक्स्प्रेसला अपघात झाला आहे.

Ten coaches of the Tapi-Ganga Express derailin Bihar | बिहारमध्ये ताप्ती-गंगा एक्स्प्रेसचे तेरा डबे घसरले, चार जण जखमी

बिहारमध्ये ताप्ती-गंगा एक्स्प्रेसचे तेरा डबे घसरले, चार जण जखमी

पाटणा - बिहारमध्ये तापी-गंगा एक्स्प्रेसला अपघात झाला आहे. तापी गंगा एक्स्प्रेसचे तेरा डबे छपराजवळील गौतम अस्थान येथे रुळावरून घसरले. या अपघातात चार जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, अपघातस्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.

आज सकाळी  9 वाजता ताप्ती गंगा एक्स्प्रेस छपरा येथून रवाना झाली होती. सुमारे 45 मिनिटांचा प्रवास केल्यावर ही एक्स्प्रेस गौतमस्थान स्टेशनवर येत होती, त्याचदरम्यान या एक्स्प्रेसचे तेरा डबे रुळावरून घसरले. सुदैवाने अपघात झाला तेव्हा ट्रेनचा वेग फार जास्त नसल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र या अपघातात एकूण चार प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  



 

Web Title: Ten coaches of the Tapi-Ganga Express derailin Bihar