टेम्पो-ट्रकची समोरासमोर धडक! अपघातात ९ प्रवाशी ठार, आवाज ऐकूनच लोक आले धावून
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 11:33 IST2025-02-24T11:32:07+5:302025-02-24T11:33:24+5:30
टेम्पो आणि ट्रक यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात ७ प्रवाशांचा मृत्यू झाला.

टेम्पो-ट्रकची समोरासमोर धडक! अपघातात ९ प्रवाशी ठार, आवाज ऐकूनच लोक आले धावून
बिहारची राजधानी पाटणामध्ये रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात ७ प्रवाशांचा मृत्यू झाला. टेम्पो आणि ट्रक यांची धडक झाल्याने ७ प्रवाशांचा जागेवरच मृत्यू झाला. हा अपघातात इतका भयंकर होता की, दोन्ही वाहने एकमेकांवर आदळल्यानंतर मोठा आवाज झाला. तो काही लोकांना घरात ऐकायला आला. त्यानंतर ते मदतीला धावून आले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
रविवारी रात्री पाटणा जिल्ह्यातील मसौढी परिसरात ही घटना घडली. ग्रामस्थांनी आवाज ऐकून घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही वाहनांचा अपघात झाल्याचे बघितल्यानंतर, याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तातडीने रुग्णावाहिकांसह घटनास्थळी धाव घेतली.
टेम्पोमधून प्रवास करत असलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम हाती घेण्यात आले. यात ७ लोकांचा जागेवरच मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. तर जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मसौढी पोलीस ठाण्याचे अधिकारी विजय कुमार यांनी सांगितले की, "नुरा पुलाजवळ टेम्पो आणि ट्रक एकमेकांवर धडकले. याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी आले. रविवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. अपघातात मृत्यू झालेले लोक टेम्पोतून ७ लोक प्रवास करत होते."
"मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. ट्रकचालकाचाही शोधही सुरू आहे. सध्या या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून केला जात असून, त्यानंतरच अपघाताचे नेमके कारण समोर येईल", असे विजय कुमार यांनी सांगितले.