तेलंगणासाठी भाजपाची यादी जाहीर; ५२ उमेदवारांची घोषणा, ३ खासदारांना विधानसभेची तिकीट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2023 14:00 IST2023-10-22T13:58:39+5:302023-10-22T14:00:01+5:30

Telangana Election 2023: विधानसभा निवडणुकीत भाजपाने तीन खासदारांना उमेदवारी दिली आहे.

Telangana Election 2023: BJP list announced for Telangana; 52 candidates announced, 3 MPs ticket to assembly | तेलंगणासाठी भाजपाची यादी जाहीर; ५२ उमेदवारांची घोषणा, ३ खासदारांना विधानसभेची तिकीट

तेलंगणासाठी भाजपाची यादी जाहीर; ५२ उमेदवारांची घोषणा, ३ खासदारांना विधानसभेची तिकीट

नवी दिल्ली: तेलंगणा विधानसभा निवडणूकीसाठी भाजपाची यादी जाहीर झाली आहे. या यादीत ५२ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. तेलंगणाभाजपाचे माजी अध्यक्ष आणि खासदार बंदी संजय कुमार यांना पक्षाने करीमनगर मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.

विधानसभा निवडणुकीत भाजपाने तीन खासदारांना उमेदवारी दिली आहे. बंदी संजय कुमार यांच्याशिवाय सोयम बापूराव यांना बोथ आणि अरविंद धर्मपुरी यांना कोरटाळा येथून तिकीट देण्यात आले आहे. याशिवाय टी राजा सिंह गोशामहलमधून निवडणूक लढवणार आहेत. तर इटाला राजेंद्र सिंह यांना हुजूराबाद आणि गजवेल या दोन जागांवरून उमेदवारी देण्यात आली आहे.

Web Title: Telangana Election 2023: BJP list announced for Telangana; 52 candidates announced, 3 MPs ticket to assembly