शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
5
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
6
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
7
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
8
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
9
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
10
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
11
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
12
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
13
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
14
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
15
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
16
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
17
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
18
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
19
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
20
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया

तेजस एक्स्प्रेस 17 ऑक्टोबरपासून धावणार? आयआरसीटीसीकडून हालचालींना वेग

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2020 2:29 PM

आयआरसीटीसीने 17 ऑक्टोबरपासून तेजस सुरू करण्यासाठी रेल्वेकडे परवानगी मागितली आहे.

ठळक मुद्देयाबाबत आयआरसीटीसीने रेल्वेला पत्र लिहिले आहे.

नवी दिल्ली : फेस्टिव्ह सीजन म्हणजेच दसरा आणि दिवाळीपूर्वी देशातील पहिली खासगी ट्रेन तेजस ट्रॅकवर पुन्हा धावण्याची शक्यता आहे. 'सीएनबीसी आवाज'ला सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आयआरसीटीसीने (इंडियन रेलवे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन) रेल्वे मंत्रालयाला 17 ऑक्टोबरपासून तेजस सुरू करण्यास तसेच लीज शुल्क माफ करण्यास सांगितले आहे.

तेजस एक्स्प्रेसच्या नावाने दिल्ली-लखनऊ, अहमदाबाद-मुंबई आणि वाराणसी-इंदूर दरम्यान खासगी ट्रेन सुरू करण्यात आल्या. मात्र, कोरोना विषाणूच्या महामारीनंतर 22 मार्चपासून या ट्रेनची वाहतूक थांबविण्यात आली आहे. दरम्यान, या खासगी ट्रेनचे परिचालन आयआरसीटीसीच्या माध्यातून करण्यात येते.

कधीपासून सुरु होणार तेजस ट्रेन?तेजस ही खासगी ट्रेन आयआरसीटीसी सुरु करणार असल्याची माहिती सुत्रांनी 'सीएनबीसी आवाज'ला दिली आहे. याबाबत आयआरसीटीसीने रेल्वेला पत्र लिहिले आहे. आयआरसीटीसीने 17 ऑक्टोबरपासून तेजस सुरू करण्यासाठी परवानगी मागितली आहे. तसेच, रेल्वेलाही लीज शुल्क माफ करण्यास सांगितले आहे. खासगी ट्रेन तेजससाठी आयआरसीटीसी दररोज 13 लाख रुपये लीज शुल्क देते.

तेजस एक्सप्रेस आपल्या खास प्रवासी सुविधांसाठी प्रसिद्ध आहे. या ट्रेनमध्ये उत्कृष्ट खाद्यपदार्थ, स्नॅक्स आणि ड्रिंक विनामूल्य आहेत. तसेच, ट्रेनला उशिरा झाल्यास प्रवाशांना नुकसान भरपाई दिली जाते. एका तासापेक्षा जास्त उशीर झाल्यास 100 रुपये आणि दोन तासांपेक्षा जास्त उशीर झाल्या 250 रुपयांची नुकसान भरपाई दिली जाते.

या मार्गांवर खासगी ट्रेन धावतेदेशाची पहिली खासगी ट्रेन तेजस एक्स्प्रेस लखनऊ ते दिल्ली मार्गावर सुरु झाली. त्यानंतर अहमदाबाद-मुंबई मार्गावर दुसरी खासगी ट्रेन सुरू झाली. तिसरी खासगी ट्रेन वाराणसीहून इंदूरसाठी सुरु करण्यात आली.

टॅग्स :Tejas Expressतेजस एक्स्प्रेसcorona virusकोरोना वायरस बातम्या