शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

जगात वाढतोय 'Tejas'चा मान; हे 'मेड इन इंडिया' लढाऊ विमान खरेदीसाठी 4 देश रांगेत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2023 9:40 PM

भारतात तयार झालेल्या स्वदेशी बनावटीच्या 'तेजस' विमानाची जगभरात चर्चा सुरू आहे.

Tejas Aircraft: आतापर्यंत भारत सरकार इतर देशांकडून लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर इत्यादींची खरेदी करायचे. पण, आता भारतातच स्वदेशी बनावटीचे लढाऊ विमान 'तेजस' बनवण्यात आले आहे. या 'मेड इन इंडिया' लढाऊ विमानाची जगभरात चर्चा होत आहे. यामुळेच एक-दोन नव्हे, तर चार देश या विमानाच्या खरेदीसाठी रांगेत उभे आहेत. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड(एचएएल)चे अध्यक्ष आणि एमडी सीबी अनंतकृष्णन यांनी याचा खुलासा केला आहे. अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः या फायटर जेटमधून उड्डाण केले होते.

तेजस हे भारतात विकसित केलेले पहिले स्वदेशी लढाऊ विमान आहे. याची धूम आता जगभर ऐकू येत आहे. अमेरिकेसह अनेक देशांनी तेजसचे कौतुक केले आहे. हे एक इंजिन असलेले विमान असून, कोणत्याही परिस्थितीत चांगल्या पद्धतीने काम करण्यास सक्षम आहे. त्यामुळेच आता हे विमान खरेदी करण्यासाठी जगातील अनेक देशांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. प्रत्येकाला या भारतीय तंत्रज्ञानाचा आपल्या युद्ध ताफ्यात समावेश करून स्वत:ला बळकट करायचे आहे.

तेजस खरेदीसाठी हे देश रांगेत भारतीय तेजस खरेदीसाठी नायजेरिया, फिलीपिन्स, अर्जेंटिना आणि इजिप्त रांगेत आहेत. एचएएलचे अध्यक्ष अनंतकृष्णन यांच्या मते या सर्व देशांकडून संभाव्य खरेदीसाठी चर्चा सुरू आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, जर चर्चा यशस्वी झाली तर या देशांना तेजसचा पुरवठा केला जाईल. विशेष म्हणजे अर्जेंटिनाला तेजसचा पुरवठा करण्यासाठी वेगळा मार्ग शोधला जाणार आहे.

अर्जेंटिनाची 'ही' समस्या भारत तेजसमध्ये ब्रिटीश भाग वापरतो, ज्यासह तेजस अर्जेंटिनाला पाठवता येत नाही. हा करार पूर्ण करण्यासाठी ब्रिटीश भागांऐवजी रशियन भाग तेजसमध्ये बसवले जातील. 1982 च्या फॉकलँड्स युद्धानंतर ब्रिटनने अर्जेंटिनाला लष्करी उपकरणे विकण्यावर बंदी घातली होती. विशेषतः ब्रिटनमध्ये बनवलेल्या वस्तूंवर अर्जेंटिनामध्ये बंदी आहे. त्यामुळे, हा करार पूर्ण करण्यासाठी तेजसचे भाग बदलले जाण्याची शक्यता आहे. 

तेजसचे फीचर्सतेजस अॅल्युमिनियम, लिथियम मिश्र धातुसह फायबर कंपोझिट स्टीलने बनलेले आहे. त्यामुळे इतर लढाऊ विमानांच्या तुलनेत ते वजनाला हलके आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे फायटर प्लेन हलके असल्यामुळे लँडिंग आणि टेक ऑफसाठी अतिशय लहान धावपट्टीची आवश्यकता आहे. हे विमान 2019 मध्येच लष्करात दाखल झाले होते, तेव्हापासून याने जगावर आपली छाप सोडली आहे.

तेजस मोठ्या प्रमाणात शस्त्रे घेऊन जाऊ शकते. तसेच, दुर्गम भागातही याची लँडिंग आणि टेक ऑफ करण्याची ताकद आहे. तेजस हवामानातील कोणत्याही अडथळ्यांचा सामना करू शकते. तेजस हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर मारा करण्यासही सक्षम आहे. तेजस विमान एकाच वेळी सुमारे 10 टार्गेट उडवू शकते.

टॅग्स :airplaneविमानfighter jetलढाऊ विमानIndiaभारतDefenceसंरक्षण विभागCentral Governmentकेंद्र सरकार