एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 06:34 IST2025-06-17T06:32:15+5:302025-06-17T06:34:43+5:30

अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातानंतर एअर इंडिया अत्यंत सतर्क असून, सोमवारी दोन विमाने तांत्रिक दोषामुळे उड्डाणानंतर परतली.

Technical fault in one plane, bomb threat to another! | एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!

एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!

नवी दिल्ली: अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातानंतर एअर इंडिया अत्यंत सतर्क असून, सोमवारी दोन विमाने तांत्रिक दोषामुळे उड्डाणानंतर परतली. फ्रँकफर्टहून हैदराबादकडे निघालेल्या विमानात बॉम्ब असल्याच्या धमकीनंतर तर रविवारी एअर इंडियाचे दिल्लीहून बडोद्याला जाणारे एक विमान उड्डाणानंतर काही मिनिटांतच परत उतरवण्यात आले होते. 

लँड झाल्यानंतर विमानाच्या टायरमधून निघू लागला धूर  
सौदी एअरलाइनचे एक विमान २४२ हज यात्रेकरूंना घेऊन जेद्दाहहून लखनौत उतरले. परंतु, लँडिंगनंतर या विमानाच्या टायरमधून धूर निघू लागला. कोणतीही दुर्घटना झाली नाही.

लुफ्तान्साचे विमान पुन्हा विमानतळावर
लुफ्तान्सा विमान कंपनीच्या फ्रँकफर्ट ते हैदराबाद या विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्यानंतर ते पुन्हा फ्रँकफर्ट येथे उतरवण्यात आले. कंपनीच्या ‘एलएच ७५२’ या विमानाने फ्रँकफर्ट विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच हैदराबाद विमानतळावर सोशल मीडियाद्वारे या विमानात बॉम्ब असल्याची धमकी आली. याची सूचना संबंधित वैमानिकाला दिल्यानंतर तातडीने हे विमान पुन्हा फ्रँकफर्ट येथे उतरवण्यात आले.

ड्रीमलायनरची धास्ती ! 
हाँगकाँगहून दिल्लीच्या दिशेने निघालेल्या विमानात काही दोष असल्याची शंका आल्यांनतर हे विमान उड्डाणानंतर काही वेळातच हाँगकाँगला परतले. हे बोईंग-७८७-८ ड्रिमलायनर विमान होते. परतल्यावर या विमानाची तपासणी केली जात आहे. 

Web Title: Technical fault in one plane, bomb threat to another!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.