शरीरसंबंध ठेवण्यासाठी १० वीच्या विद्यार्थ्याच्या शिक्षिका मागे लागली; रोज रात्री मेसेज...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2023 16:38 IST2023-10-12T16:38:13+5:302023-10-12T16:38:59+5:30

विद्यार्थ्याच्या वडिलांनी या प्रकाराची तक्रार डीएम आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे केली आहे. यावर जागे झालेल्या पोलिसांनी याची चौकशी कैंट पोलिसांकडे सोपविली आहे.

teacher stalks Class 10 student's for sex; Message every night... Father read chats and then complained kanpur news | शरीरसंबंध ठेवण्यासाठी १० वीच्या विद्यार्थ्याच्या शिक्षिका मागे लागली; रोज रात्री मेसेज...

शरीरसंबंध ठेवण्यासाठी १० वीच्या विद्यार्थ्याच्या शिक्षिका मागे लागली; रोज रात्री मेसेज...

परदेशात जे घडायचे ते आता आपल्या देशातही घडू लागले आहे. उत्तर प्रदेशमध्ये आता कोणते गुन्हे घडत नाहीएत असे नाहीय. कानपूरमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. एका शिक्षिकेने १० वी च्या मुलावर सेक्ससाठी दबाव टाकला होता. एवढेच नाही तर त्याचे धर्मांतरही करण्याचा डाव तिने आखला होता, असा आरोप या मुलाच्या वडिलांनी केला आहे. 

विद्यार्थ्याच्या वडिलांनी या प्रकाराची तक्रार डीएम आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे केली आहे. यावर जागे झालेल्या पोलिसांनी याची चौकशी कैंट पोलिसांकडे सोपविली आहे. बुधवारी विद्यार्थ्याच्या कुटुंबाने हिंदुत्ववादी संघटनांच्या नेत्यांसोबत पोलिसांकडे जात कारवाईची मागणी केली आहे. 

विद्यार्थी उन्नावचा आहे. त्याला ही शिक्षिका रोज रात्री मोबाईलवर मेसेज करायची. तसेच शरीर संबंध ठेवण्यासाठई दबाव टाकायची. एवढेच नाही तर शिक्षिकेचा पती आणि भाऊ देखील त्या शाळेत काम करतात. त्याच्या सोबत मिळून त्या मुलाचा जबरदस्तीने धर्म बदलण्याचे कृत्य केले जात होते. काही दिवसांपूर्वी विद्यार्थ्याच्या वडिलांनी मुलाच्या मोबाईलमध्ये हे चॅट पाहिले होते. यानंतर ते शाळेत गेले होते. तिथे त्या शिक्षिकेने आपण हे करत असल्याचे कबुल केले होते. 

विद्यार्थ्याच्या वडिलांनुसार याची तक्रार त्यांनी शाळा प्रशासनाकडे केली होती. परंतू, शिक्षिका, तिचा पती आणि भावावर कोणताही कारवाई केली गेली नाही. आता हेच लोक आपल्या कुटुंबाला धमक्या देत आहेत. यामुळे कुटुंब घाबरलेले असून या प्रकारामुळे मुलाच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. 

एसीपी कँट ब्रज नारायण सिंह यांनी सांगितले की, संपूर्ण घटनेचा तपास सुरू आहे. प्राथमिक तपासात धर्मांतराच्या आरोपांना पुष्टी मिळालेली नाही. तपासात जे काही तथ्य समोर येईल, त्याआधारे कारवाई केली जाईल.

Web Title: teacher stalks Class 10 student's for sex; Message every night... Father read chats and then complained kanpur news