नराधम शिक्षकाला १११ वर्षांची शिक्षा; विद्यार्थीनीसोबत केलेलं कृत्य ऐकून पत्नीने स्वतःला संपवलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 14:53 IST2025-01-01T14:53:42+5:302025-01-01T14:53:58+5:30
केरळमधील फास्ट ट्रॅक कोर्टाने एका आरोपीला १११ वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

नराधम शिक्षकाला १११ वर्षांची शिक्षा; विद्यार्थीनीसोबत केलेलं कृत्य ऐकून पत्नीने स्वतःला संपवलं
Kerala Crime : केरळमधील एका विशेष फास्ट ट्रॅक कोर्टाने मंगळवारी एका विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या शिकवणी शिक्षकाला १११ वर्षे सश्रम कारावास आणि १.०५ लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास आरोपीला एक वर्षाचा अतिरिक्त कारावास भोगावा लागणार आहे. पाच वर्षांपूर्वी घडलेल्या या हादरवणाऱ्या प्रकरणात सुनावण्यात आलेल्या शिक्षेची सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे.
केरळच्या तिरुअनंतपुरम येथील फास्ट ट्रॅक कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार, दोषी मनोज (४४) दंड भरण्यास असमर्थ ठरल्यास त्याला आणखी एक वर्षाची शिक्षा भोगावी लागणार आहे. पतीने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचे मनोजच्या पत्नीला समजल्यानंतर तिने आत्महत्या केली होती. बलात्कार प्रकरणात मनोजला कोणतीही दयामाया दाखवता येणार नाही, असे कोर्टाने म्हटलं.
२ जुलै २०१९ रोजी हा सगळा प्रकार घडला होता. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, दोषी मनोज हा सरकारी कर्मचारी असून तो त्याच्या घरी शिकवणी शिकवत असे. मनोजने विद्यार्थिनीला स्पेशल क्लासच्या बहाण्याने आपल्या घरी बोलावून तिच्यावर बलात्कार केला आणि मोबाईलमधून तिचे आक्षेपार्ह फोटोही काढले. बलात्काराच्या घटनेनंतर मुलगी खूप घाबरली होती आणि तिने शिकवणीसाठी येणे बंद केले होते. यानंतर आरोपींनी हे फोटो व्हायरल केले. घटनेची माहिती मिळताच मुलाच्या कुटुंबीयांनी फोर्ट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. याआधीही त्याने पीडितेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला होता.
फिर्यादीनुसार, आरोपीने केवळ तिच्यावर लैंगिक अत्याचार केले नाही तर अत्याचाराचे फोटोही त्याच्या मोबाईल फोनवर काढसे. आरएस विजय मोहन आणि आरव्ही अखिलेश यांनी फिर्यादीची बाजू मांडली. या घटनेनंतर मुलीला धक्का बसला आणि ती घाबरली आणि तिला एकटे वाटले. तिने शिकवणीला जाणे बंद केले आणि नंतर आरोपीने मुलीची प्रतिमा खराब करण्यासाठी फोटो व्हायरल केले.
तक्रार दाखल होताच पोलिसांनी मनोजला अटक करून त्याचा फोन जप्त करून तो फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवला. त्यानंतर फोनमध्ये अल्पवयीन पीडितेचे आक्षेपार्ह फोटो सापडले. दुसरीकडे, मनोजने घटनेच्या दिवशी कार्यालयातच असल्याचा दावा केला होता. यासाठी त्याने नोंदणीकृत रजेचे रेकॉर्ड स्वाक्षरीसह सादर केले. मात्र, फिर्यादीने सादर केलेल्या आरोपीच्या फोनच्या कॉल रेकॉर्डवरून मनोज घटनेच्या दिवशी शिकवणी शिकवत असल्याचे स्पष्ट झाले.