शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
2
‘दुबार’ निकाल टळला; फैसला २१ डिसेंबरलाच; नागपूर व औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय
3
आजचे राशीभविष्य, ३ डिसेंबर २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता
4
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
5
अयोध्येत होणार आता भव्य राम मंदिर संग्रहालय; सरकारने दिली ५२ एकर जमीन, TATA कंपनी बांधणार
6
“निवडणूक आयुक्तांच्या विरोधात महाभियोग आणण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे”: नाना पटोले
7
सावंतवाडीत पोलिस ठाण्यात शिंदे सेना-भाजपाचे कार्यकर्ते भिडले; पोलिसांकडून वेळीच हस्तक्षेप
8
DRDO ची मोठी कामगिरी; 800 KM वेगावर फायटर जेट एस्केप सिस्टीमचे यशस्वी परीक्षण
9
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
10
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
11
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
12
भाजपचे उमेदवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
13
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
14
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
15
“नगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेची पायमल्ली, महायुतीविरोधात हजारो तक्रारी”; काँग्रेसची टीका
16
दिल्लीच्या CM रेखा गुप्ता यांच्या हस्ते पिकलबॉल लीग ट्रॉफीचे अनावरण; मुंबई-चेन्नईसह ६ फ्रँचायझी संघात रंगणार स्पर्धा
17
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
18
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
19
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
20
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
Daily Top 2Weekly Top 5

तारसा... जोड

By admin | Updated: December 25, 2014 22:41 IST

सुंदरगाव येथील जिल्हा परिषद शाळेत आहार पटसंख्येनुसार शिजविला जात नाही. धान्याची योग्य साफसफाई न करताच अन्न शिजविल्या जाते. तेच अन्न विद्यार्थ्यांना खायला दिले जाते. या संदर्भात मुख्याध्यापकांना विचारले असता, मुले घरून डबा आणतात, त्यामुळे आहार कमी शिजविला जातो, अशी माहिती त्यांनी दिली. जिल्हा परिषद शाळा मांगली तेली शाळेत निकृष्ट दर्जाचा आहार दिला जातो. येथील शाळेत तांदळाला अळ्या लागल्या असून स्वयंपाकगृहात लोखंडी सामान ठेवले असल्याचे दिसून आले. अशा निकृष्ट आहारामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ होत असल्याचा प्रकार तालुक्यातील शाळांमध्ये सुरू आहे. तालुक्यातील चिचोली, दहेगाव, पिपरी, खंडाळा, राजोली आदी गावातील शाळांत अशाचप्रकारे आहार पुरविल्या जात असल्याची पालकांची ओरड आहे. विद्यार्थ्यांच्या पोषण आहारातील भाजीपाल्याची चवदार चटणी बनवून खाणाऱ्या शिक्षकांवर प्रशासन कुठली कारवाई करेल, याकडे पालकांचे ल

सुंदरगाव येथील जिल्हा परिषद शाळेत आहार पटसंख्येनुसार शिजविला जात नाही. धान्याची योग्य साफसफाई न करताच अन्न शिजविल्या जाते. तेच अन्न विद्यार्थ्यांना खायला दिले जाते. या संदर्भात मुख्याध्यापकांना विचारले असता, मुले घरून डबा आणतात, त्यामुळे आहार कमी शिजविला जातो, अशी माहिती त्यांनी दिली. जिल्हा परिषद शाळा मांगली तेली शाळेत निकृष्ट दर्जाचा आहार दिला जातो. येथील शाळेत तांदळाला अळ्या लागल्या असून स्वयंपाकगृहात लोखंडी सामान ठेवले असल्याचे दिसून आले. अशा निकृष्ट आहारामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ होत असल्याचा प्रकार तालुक्यातील शाळांमध्ये सुरू आहे. तालुक्यातील चिचोली, दहेगाव, पिपरी, खंडाळा, राजोली आदी गावातील शाळांत अशाचप्रकारे आहार पुरविल्या जात असल्याची पालकांची ओरड आहे. विद्यार्थ्यांच्या पोषण आहारातील भाजीपाल्याची चवदार चटणी बनवून खाणाऱ्या शिक्षकांवर प्रशासन कुठली कारवाई करेल, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.
चौकट....
दोन शिक्षक अन् वर्ग पाच
चारभा जिल्हा परिषद शाळेतदेखील विद्यार्थ्यांसाठी मेन्यूनुसार आहार शिजविला जात नाही. आहार शिजविण्याची जबाबदारी एका स्थानिक महिलेकडे देण्यात आली आहे. या शाळेत शाळा सुरू होण्यापूर्वीच अन्न शिजविल्या जाते. ते दुपारी विद्यार्थ्यांना खायला दिले जाते. विशेष म्हणजे येथील शाळेत दोन शिक्षक अन् पाच वर्ग अशी स्थिती आहे. एखाद्या दिवशी एक शिक्षक गैरहजर असल्यास एकाच खोलीत पाचही वर्ग भरविली जातात. अशावेळी वर्ग पाच आणि शिक्षक एक, त्यामुळे शिक्षकांचीदेखील मोठी दमछाक होते. परिणामी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होत आहे.