Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 15:03 IST2025-09-28T15:02:59+5:302025-09-28T15:03:43+5:30
Tamilnadu Stampede : आकाश काही कामासाठी बाहेर गेला होता, त्याचवेळी तो अचानक चेंगराचेंगरीत अडकला.

Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
तमिळनाडूतील करूर येथे झालेल्या चेंगराचेंगरीत आतापर्यंत ३८ लोकांचा मृत्यू झाला आहे. राज्य पोलीस महासंचालक जी. वेंकटरामन यांनी रविवारी सकाळी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये १२ पुरुष, १६ महिला आणि १० मुलांचा समावेश आहे. याच दरम्यान २४ वर्षांच्या आकाशच्या मृत्यूने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. पुढच्या महिन्यात आकाशचं लग्न होतं. या दुर्घटनेमुळे क्षणात होत्याचं नव्हतं झालं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आकाश काही कामासाठी बाहेर गेला होता, त्याचवेळी तो अचानक चेंगराचेंगरीत अडकला. करूर रुग्णालयाच्या आवारात आईवडिलांनी आपल्या मुलाचा एक सेल्फी दाखवला, जो त्यांनी नुकताच एकत्र काढला होता. आई-वडील ढसाढसा रडत होते. “आता आम्ही कोणाला नवरदेव बनवू?” असं म्हणत आईने टाहो फोडला.
"अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
घरामध्ये लग्नाची तयारी जोरात सुरू
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश केवळ घराचा आधार नव्हता, तर तो अतिशय मनमिळाऊ आणि जबाबदार देखील होता. घरामध्ये लग्नाची तयारी जोरात सुरू होती आणि नातेवाईकांना बोलावण्याची यादीही तयार झाली होती, पण या दुर्घटनेने सर्व आनंद हिरावून घेतला. करूर दुर्घटनेबद्दल अभिनेता थलपती विजयने दुःख व्यक्त केलं.
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख
विजय म्हणाला की, हे खूप मोठं नुकसान आहे आणि कोणतेही शब्द हे दु:ख कमी करू शकत नाहीत. मात्र कुटुंबातील सदस्य म्हणून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २० लाख रुपये आणि जखमींना २ लाख रुपयांची आर्थिक मदत करणार आहे. अभिनेत्याने सर्व जखमींसाठी प्रार्थना केली आणि त्यांना आश्वासन दिलं की तामिळनाडू विजय असोसिएशन आवश्यक ती सर्व मदत करण्यासाठी त्यांच्यासोबत आहे. मुख्यमंत्री एमके स्टॅलिन काल रात्री करूर येथे पोहोचले आणि त्यांनी चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांची आणि मेडिकल कॉलेजमध्ये जखमींची भेट घेतली.