शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

भाजपला सत्तेतून बाहेर करून तामिळनाडूने देशाला दिशा दाखवावी; राहुल गांधी यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2021 5:02 AM

संस्कृतीविरोधी शक्तींना दूर ठेवा;  तामिळ लोकांचे प्रतिनिधित्व करणारी व्यक्तीच मुख्यमंत्री 

नागरकोइल : भाषा व संस्कृतीविरोधी शक्तींना आणि एक संस्कृती, एक राष्ट्र व एक इतिहास ही संकल्पना समोर आणणाऱ्यांना दूर ठेवण्यासाठी तामिळनाडूने भारताला दिशा दाखवायला हवी, असे मत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सोमवारी व्यक्त केले. 

राहुल गांधी हे राज्याच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. येथे एका सभेला संबोधित करताना ते म्हणाले की, इतिहासाने हे दाखवून दिले आहे की, तामिळनाडूत तामिळ लोकांशिवाय अन्य कोणी सत्तेवर येऊ शकत नाही. २३४ सदस्य असलेल्या विधानसभेसाठी राज्यात ६ एप्रिल रोजी निवडणूक होणार आहे. काँग्रेस द्रमुकसोबत आघाडी करून निवडणूक लढत आहे. 

राहुल गांधी म्हणाले की, या निवडणुकीतूनही हेच दिसून येईल की, तामिळ लोकांचे प्रतिनिधित्व करणारी व्यक्तीच येथे मुख्यमंत्री बनू शकेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर झुकणारे राज्याचे मुख्यमंत्री (के. पलानीस्वामी) असे करू शकत नाहीत. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील लोकांच्या पुढे झुकायला हवे. आरएसएस आणि मोदी हे तामिळ भाषेचा आणि संस्कृतीचा अपमान करतात. त्यामुळे लोकांनी त्यांना येथे पाय पसरू देऊ नयेत. मोदी हे एक संस्कृती, एक राष्ट्र, एक इतिहास, एक नेताच्या गोष्टी करतात. तामिळ भाषा भारतीय नाही का, बांगला भारतीय भाषा नाही का, तामिळ संस्कृती भारतीय संस्कृती नाही का, असा सवाल करून ते म्हणाले की, या निवडणुकीत हीच लढाई लढली जाणार आहे. ज्याप्रमाणे भारताच्या सर्व भाषा आणि धर्मांचे रक्षण करणे माझे कर्तव्य आहे, त्याचप्रमाणे तामिळ भाषा, संस्कृती व इतिहास यांचे संरक्षण करणे माझे कर्तव्य आहे. 

मंदिरात पूजा करून प्रियांका गांधींचा आसाम दौरा सुरू गुवाहाटी : गुवाहाटी येथील कामाख्या देवी मंदिरात पूजा करून काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी सोमवारपासून आसामच्या दोन दिवसीय दौऱ्याला प्रारंभ केला. राज्यात १२६ सदस्यीय विधानसभेसाठी २७ मार्च, १ आणि ६ एप्रिल अशा तीन टप्प्यात मतदान होणार आहे. प्रियांका गांधी प्रथम जलुकबारी भागात थांबल्या. येथे काँग्रेस समर्थकांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर नीलाचल हिल्सस्थित शक्तिपीठाकडे त्या रवाना झाल्या. प्रियांका गांधी येथे लाल पोशाखात दिसून आल्या. हा रंग शक्तिचे प्रतीक मानला जातो. त्या म्हणाल्या की, मी कुटुंब आणि सर्वात अधिक आसामच्या लोकांसाठी प्रार्थना केली. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाTamilnaduतामिळनाडूTamil Nadu Assembly Elections 2021तामिळनाडू विधानसभा निवडणूक २०२१