Video - तामिळनाडूच्या शिवकाशी येथील फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट, ५ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 11:10 IST2025-07-01T11:09:59+5:302025-07-01T11:10:42+5:30
तामिळनाडूतील शिवकाशी येथील एका फटाक्याच्या कारखान्यात मंगळवारी सकाळी मोठा स्फोट झाला. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

Video - तामिळनाडूच्या शिवकाशी येथील फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट, ५ जणांचा मृत्यू
तामिळनाडूतील शिवकाशी येथील एका फटाक्याच्या कारखान्यात मंगळवारी सकाळी मोठा स्फोट झाला. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे आणि अनेक कर्मचारी जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे आणि रुग्णवाहिकांसह आपत्कालीन सेवा घटनास्थळी पोहोचल्या आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, कामगार फटाके बनवण्याच्या प्रक्रियेत केमिकल्ससह काम करत असताना हा स्फोट झाला. एक किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर मोठा स्फोट झाल्याचा आवाज ऐकू आला आणि कारखान्यातून मोठ्या प्रमाणात धूर निघताना दिसत आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
VIDEO | Tamil Nadu: An explosion at the Gokulesh Fireworks Factory in Chinnakamanpatti, near Sivakasi, in the Virudhunagar district on Tuesday morning killed five workers. Four other workers were injured in the incident. Relief and rescue operations underway.#TamilNaduNews… pic.twitter.com/oBLj2RXSIt
— Press Trust of India (@PTI_News) July 1, 2025
यामध्ये पाच कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे आणि इतर अनेक कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना शिवकाशी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
पोलिस आणि अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले आहेत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत आणि ढिगारा काढण्याचे काम सुरू आहे. सोमवारी तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यातील एका फार्मा प्लांटमध्ये स्फोट झाला. यामध्ये आतापर्यंत ३४ जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.