शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

एआय, लेझरचा थरार! 'होलोग्राम विजय'ने वेधले लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 09:40 IST

Tamil Nadu Assembly Election: तामिळनाडूतील राजकीय प्रचाराची व्याख्या बदलत 'तमिळगा वेत्री कळघम' (टीव्हीके) पक्षाने एक पाऊल पुढे टाकले आहे. कुंभकोनम मतदारसंघाचे उमेदवार विनोथ रवी यांनी चक्क अभिनेता ते राजकारणी बनलेले 'थलपती' विजय यांचा 'थ्री-डी होलोग्राम' प्रचारासाठी मैदानात उतरवला आहे.

चेन्नई -  तामिळनाडूतील राजकीय प्रचाराची व्याख्या बदलत 'तमिळगा वेत्री कळघम' (टीव्हीके) पक्षाने एक पाऊल पुढे टाकले आहे. कुंभकोनम मतदारसंघाचे उमेदवार विनोथ रवी यांनी चक्क अभिनेता ते राजकारणी बनलेले 'थलपती' विजय यांचा 'थ्री-डी होलोग्राम' प्रचारासाठी मैदानात उतरवला आहे. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी हे तंत्रज्ञान सध्या चर्चेचा विषय ठरले आहे.

कुंभकोनम मतदारसंघात १२ एप्रिल रोजी या तंत्रज्ञानाने प्रचारकार्यात प्रवेश केला. एखाद्या प्रचार वाहनावरून विजय यांची हुबेहूब चालती-बोलती डिजिटल प्रतिमा मतदारांशी संवाद साधताना दिसत आहे. यामुळे विजय प्रत्यक्ष तिथे उपस्थित असल्याचा भास निर्माण होत असून, ही 'अभासी' प्रतिमा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.

...अशी झाली निर्मितीटीव्हीकेचे तंजावर जिल्हा खजिनदार विजय चंद्रन यांनी सांगितले की, "आमच्या नेत्याला सर्व २०० हून अधिक मतदारसंघांत प्रत्यक्ष जाणे शक्य नाही. त्यामुळे त्यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी आम्ही या तंत्रज्ञानाचा वापर केला. यामुळे आमचे नेते एकाच वेळी राज्याच्या कानाकोपऱ्यात मतदारांना प्रत्यक्ष भेटल्याचा अनुभव देऊ शकतात." राजकीय विश्लेषकांच्या मते, 'एआय-फर्स्ट' रणनीती तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी आखण्यात आली आहे. पारंपरिक प्रचाराच्या तुलनेत टीव्हीकेने स्वतःला वेगळे सिद्ध करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे.

अवघ्या २० वर्षीय युवकाने बदलले प्रचाराचे तंत्र ही किमया साधली आहे प्रवीण के. या २० वर्षीय तरुणाने. प्रवीण हा 'एआय आणि डेटा सायन्स'चा तृतीय वर्षाचा विद्यार्थी असून तो एक अर्धवेळ मार्केटिंग एजन्सी चालवतो.त्याने विजय यांच्या भाषणाचा ५० सेकंदांचा एक 'एआय व्हिडिओ' तयार केला असून तो होलोग्रामच्या स्वरूपात प्रक्षेपित केला आहे. केवळ टीव्हीकेच नव्हे, तर अण्णा द्रमुकसारख्या मोठ्या पक्षांकडूनही त्याला आता अशा व्हिडिओसाठी विचारणा होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : AI, Laser Thrills! 'Hologram Victory' Captures Attention

Web Summary : Tamil Nadu party uses 'Thalapathy' Vijay's 3D hologram for campaigning. A 20-year-old created the AI video, allowing the leader to virtually connect with voters across the state, attracting large crowds and youthful voters.
टॅग्स :TamilnaduतामिळनाडूAssembly Electionविधानसभा निवडणूक २०२६