शॉकिंग! तामिळनाडूमध्ये ९ महिन्यांत २० हजार अल्पवयीन मुली गर्भवती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2018 05:38 AM2018-12-19T05:38:22+5:302018-12-19T05:39:03+5:30

बालविवाहाचे प्रमाण वाढले; बहुतांश मुली १६ ते १८ वयोगटातील

In Tamil Nadu, 20 thousand minor girls pregnant in 9 months | शॉकिंग! तामिळनाडूमध्ये ९ महिन्यांत २० हजार अल्पवयीन मुली गर्भवती

शॉकिंग! तामिळनाडूमध्ये ९ महिन्यांत २० हजार अल्पवयीन मुली गर्भवती

Next

चेन्नई : तामिळनाडूत अल्पवयीन मुली गर्भवती होण्याचे प्रमाण वेगाने वाढत आहे. गत ९ महिन्यांत या राज्यात २० हजार मुली गर्भवती झाल्याचे वृत्त आहे. आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या जवळपास २० हजार मुली एप्रिल २०१८ ते डिसेंबर २०१८ या काळात गर्भवती झाल्या आहेत.

राष्ट्रीय आरोग्य मिशनचे संचालक डॉ. अहमद यांनी सांगितले की, गर्भवती होणाऱ्या बहुतांश मुली १६ ते १८ या वयोगटातील आहेत, तसेच यात विवाह झालेल्याही अनेक मुली आहेत. याचा अर्थ असा आहे की, राज्यात बालविवाह मोठ्या प्रमाणात होत आहेत. तथापि, समाजकल्याण विभाग राज्यात २००८ ते २०१८ या काळात ६९५५ अल्पवयीन मुलींचे विवाह झाल्याचे सांगत आहे. बालहक्कांसाठी लढणाºया एका संस्थेचे म्हणणे आहे की, कमी वयात मुलींचे गर्भवती होणे ही सामाजिक समस्या तर आहेच; पण त्याहीपेक्षा ती मोठी आरोग्यसमस्या आहे. लोकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करायला हवी. 

गर्भपातासही नकार
च्या अहवालात असेही म्हटले की, गर्भवती झालेल्या या मुलींपैकी अतिशय कमी मुली गर्भपात करू इच्छितात. अशावेळी ज्यांना मूल हवे आहे अशा मुलींची प्रकृती काळजी करण्यासारखी आहे. आरोग्य विभाग अशा गर्भवतींवर लक्ष ठेवून आहे.

Web Title: In Tamil Nadu, 20 thousand minor girls pregnant in 9 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app