सुरक्षेसाठी SWAT कमांडो, 250 पोलीस अन् NIA…गँगस्टर काला जथेडीच्या लग्नाची सर्वत्र चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 10:06 PM2024-03-11T22:06:32+5:302024-03-11T22:08:28+5:30

12 मार्च रोजी दिल्लीतील द्वारका परिसरात कुख्यात गँगस्टर काला जथेडी आणि लेडी डॉन अनुराधा चौधरीचे लग्न होणार आहे.

SWAT commandos, 250 cops and NIA for security…Gangster Kala Jathedi's wedding is the talk of the town | सुरक्षेसाठी SWAT कमांडो, 250 पोलीस अन् NIA…गँगस्टर काला जथेडीच्या लग्नाची सर्वत्र चर्चा

सुरक्षेसाठी SWAT कमांडो, 250 पोलीस अन् NIA…गँगस्टर काला जथेडीच्या लग्नाची सर्वत्र चर्चा

कुख्यात गँगस्टर संदीप उर्फ ​​काला जथेडी आणि लेडी डॉन अनुराधा चौधरी उर्फ ​​मॅडम मिंज यांचे उद्या, म्हणजेच 12 मार्च रोजी दिल्लीतील द्वारका भागात लग्न होणार आहे. द्वारका येथील संतोष गार्डनमध्ये हा सोहळा पार पडेल. या लग्नासाठी गँगस्टर काला जथेडीला फक्त 6 तासांचा वेळ मिळाला आहे. 6 तासांनंतर जथेडीला परत तिहार तुरुंगात नेले जाईल. दरम्यान, या दोघांच्या लग्नात पोलिसांचा कडक पहारा असेल. 

मिळालेल्या माहितीनुसार, SWAT कमांडो आणि हायटेक शस्त्रांसह 250 पोलिसांसमोर लग्नाचे विधी पूर्ण केले जातील. तिहार जेल ते संतोष मॅरेज गार्डनमध्ये सुमारे 12 किलोमीटरचे अंतर आहे. लग्नासाठी तथेडीला कडेकोट बंदोबस्तात तिहारमधून संतोष गार्डनमध्ये नेण्यात येईल. सकाळी 10 वाजता जथेडी लग्नात पोहचेल आणि 4 वाजता त्याला परत तिहारमध्ये नेण्यात येईल.

साध्या कपड्यात पोलिस तैनात
तथेडीच्या लग्नात तैनात असलेले पोलीस सूटा-बूटात पहारा देतील. यावेळी कुठल्याही प्रकारच्या हल्ल्यांना तोंड देण्यासाठी पोलिसांकडे हायटेक शस्त्रे दिली जातील. या लग्नावर केवळ SWAT कमांडो, तीन राज्यांचे पोलीसच नाही तर NIA चीही नजर राहणार आहे. लग्नात काला जथेडी आणि अनुराधा यांचे कुटुंबीय उपस्थित राहणार आहेत. या कुटुंबातील सदस्यांची संख्या दीडशेच्या आसपास असल्याचे सांगण्यात येत आहे. 

लग्नसराईत विशेष व्यवस्था
लग्नासाठी मॅरेज गार्डमध्येही अनेक खास व्यवस्था करण्यात आल्या आहेत. सुरक्षेबाबत बोलायचे झाले तर प्रत्येक कोपऱ्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे पोलिसांची नजर असेल. इतकंच नाही तर येथे उपस्थित असलेल्या वेटर आणि कर्मचाऱ्यांना ओळखपत्रे दिली जाणार आहेत. लग्नामुळे आजूबाजूची दुकाने बंद ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. याशिवाय, लग्नादरम्यान लॉरेन्स बिश्नोई टोळी आणि काला जथेडी टोळीवर पोलिसांची करडी नजर राहणार  आहे. बंबीहा आणि नीजर बवाना टोळीसह सुमारे डझनभर टोळ्या काला जथेडीचे शत्रू आहेत. त्यामुळे हे लग्न पोलिसांसाठी डोकेदुखी ठरले आहे.

Web Title: SWAT commandos, 250 cops and NIA for security…Gangster Kala Jathedi's wedding is the talk of the town

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.