स्वामी हे माझे ‘हिरो’ - उमा भारती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2016 02:02 IST2016-06-06T02:02:18+5:302016-06-06T02:02:18+5:30

अयोध्या मंदिराचे बांधकाम या वर्षाअखेरीस सुरू होणार असल्याचे विधान भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केले असून त्यांच्या शब्दांवर माझा विश्वास आहे.

Swami is my 'Hero' - Uma Bharti | स्वामी हे माझे ‘हिरो’ - उमा भारती

स्वामी हे माझे ‘हिरो’ - उमा भारती

नवी दिल्ली : अयोध्या मंदिराचे बांधकाम या वर्षाअखेरीस सुरू होणार असल्याचे विधान भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केले असून त्यांच्या शब्दांवर माझा विश्वास आहे. एवढेच नव्हे तर ते माझे ‘हिरो’आहेत, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी स्वामी यांची स्तुती केली.
हिंदी भाषकाचे हृदयस्थान असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या नेतृत्वात भाजप सरकार स्थापन करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला त्याचवेळी स्वत:ला मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार घोषित केली जाण्याची शक्यता फेटाळली आहे. भारती म्हणाल्या की, मी स्वामींचा नितांत आदर करते. ते माझे हिरो आहेत. आणीबाणीवेळी डॉ. स्वामी, जॉर्ज फर्नांडिस हे माझे हिरो होते. स्वामी यांचे व्यक्तिमत्त्व माझ्यासाठी आदर्शवत आहे. त्यामुळे ते सांगतात त्यावर माझा विश्वास आहे.
भाजपा नेतृत्वाने राममंदिरासंबंधी प्रश्नाला बगल देत उत्तर प्रदेश निवडणुकीत विकास हाच मुद्दा राहणार असल्याचे स्पष्ट केले असताना भारती यांच्या विधानाला महत्त्व प्राप्त झाले आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Swami is my 'Hero' - Uma Bharti