शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

आंध्र प्रदेशच्या राज्यपाल झाल्याच्या वृत्ताचं सुषमा स्वराजांकडून खंडन, म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2019 9:46 AM

डॉ. हर्षवर्धन यांच्या ट्विटनंतर तासाभरानं सुषमा स्वराज यांनी ट्विट करत या वृत्ताचं खंडन केलं.

नवी दिल्ली: माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची आंध्र प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्याचं ट्विट केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. डॉ. हर्षवर्धन यांच्या ट्विटनंतर तासाभरानं सुषमा स्वराज यांनी ट्विट करत या वृत्ताचं खंडन केलं. आंध्र प्रदेशच्या राज्यपालपदी माजी नियुक्ती झाल्याचं वृत्त खोटं आहे, असं सुषमा स्वराज ट्विट करत म्हणाल्या आहेत.  हर्षवर्धन यांनी त्यांच्या ट्विटमध्ये राज्यपाल झाल्याबद्दल स्वराज यांचं अभिनंदन केलं होतं. मात्र थोड्याच वेळात त्यांनी ट्विट डिलीट केल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं.स्वराज या मोदी सरकार 1मध्ये परराष्ट्र मंत्री होत्या. मात्र त्यांना मोदी सरकार 2 मध्ये मंत्रिपद देण्यात आलेलं नाही. 'भाजपाच्या वरिष्ठ नेत्या आणि माझ्या ताई, माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची आंध्र प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा. सर्वच क्षेत्रात तुम्हाला असलेल्या अनुभवाचा जनतेला फायदा होईल,' असं हर्षवर्धन यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं.स्वराज यांच्या नियुक्तीची कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसताना हर्षवर्धन यांनी हे ट्विट केलं होतं. सध्या ईसीएल नरसिम्हन आंध्र प्रदेशचे राज्यपाल आहेत. त्यांच्याकडे तेलंगणाचीदेखील जबाबदारी आहे. 

टॅग्स :Sushma Swarajसुषमा स्वराज