शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
2
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
3
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
4
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
5
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
6
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
7
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
8
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
9
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
10
Mamata Banerjee : "मी माफी मागते"; मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळ पाहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज
11
H-1B व्हिसाच्या नव्या नियमांवरुन ट्रम्पच गोत्यात, वॉशिंग्टन ते कॅलिफोर्नियापर्यंत १९ राज्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला
12
इंडिगोला आणखी एक धक्का; रांचीत लँडिंग दरम्यान 'टेल स्ट्राइक'; थोडक्यात वाचले ७० प्रवासी
13
Lionel Messi: सॉल्ट लेक स्टेडियम तोडफोडप्रकरणी आयोजकाला अटक, प्रेक्षकांनाही तिकिटाचे पैसे परत मिळणार!
14
WhatsApp कॉलवर बोलताय? तुमचं लोकेशन होऊ शकतं ट्रॅक; सुरक्षिततेसाठी ऑन करा 'ही' सेटिंग
15
"आम्ही थांबणार नाही..", दुसऱ्या बाळाच्या जन्माआधीच भारती सिंग करतेय तिसऱ्या बाळाचं प्लानिंग? पती हर्ष म्हणाला...
16
Stock Market Holidays: पुढच्या वर्षी १५ दिवस बंद राहणार शेअर बाजार, पाहा NSE मध्ये सुट्ट्या कधी, पाहा लिस्ट
17
कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी उपस्थित केलं भाजपाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह, म्हणाले, येथे सर्व निर्णय... 
18
जिथं वक्फचा वाद उफाळला, तिथे भाजपाला मिळाला 'ऐतिहासिक' विजय; केरळमध्ये हैराण करणारा निकाल
19
Gold-Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; १८ कॅरेट सोनंही १ लाखांच्या पार, मुंबई ते दिल्ली नवे दर काय?
20
“विधान परिषदेतील नियम, परंपरा आणि चर्चांमुळे लोकशाही बळकट”: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
Daily Top 2Weekly Top 5

सुशांत प्रकरणी CBI तपासास महाराष्ट्र सरकारचा विरोध, प्रगती अहवालासह उत्तर केले दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2020 14:43 IST

Sushant Singh Rajput Suicide : सीबीआय तपासाला महाराष्ट्र सरकारने विरोध केला आहे. महाराष्ट्र शासनाने सीलबंद लिफाफ्यात तपासाचा प्रगती अहवाल सर्वोच्च न्यायालयात दाखल केला आहे.

ठळक मुद्देसर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या उत्तरात महाराष्ट्र सरकारने बिहारवर बरेच आरोप केले आहेत.केंद्र सरकारने बिहारची अनधिकृत शिफारस मान्य करणे हे केंद्र-राज्य संबंधांच्या घटनात्मक निर्णयाच्या विरोधात आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यूप्रकरणी चौकशी सुरू आहे. दरम्यान, महाराष्ट्रसरकारनेही शनिवारी म्हणजेच आज  सर्वोच्च न्यायालयात उत्तर दाखल केले. सीबीआय तपासाला महाराष्ट्रसरकारने विरोध केला आहे. महाराष्ट्र शासनाने सीलबंद लिफाफ्यात तपासाचा प्रगती अहवाल सर्वोच्च न्यायालयात दाखल केला आहे.सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या उत्तरात महाराष्ट्र सरकारने बिहारवर बरेच आरोप केले आहेत. महाराष्ट्र सरकारने म्हटले आहे की, बिहार सरकारने या प्रकरणात नियमांविरूद्ध काम केले आहे. बिहार सरकारला केवळ झिरो एफआयआर नोंदविण्याचा अधिकार होता. त्यांनी एफआयआर दाखल करुन आम्हाला पाठवायला हवा होता. महाराष्ट्र सरकारने म्हटले आहे की, बिहार पोलिसांनी एफआयआर नोंदवून तपास सुरू केला हे चुकीचे आहे. तसेच अशाप्रकारे तपास करणं बेकायदेशीर असतो, तर बिहार सरकार सीबीआय चौकशीची शिफारस कशी करू शकते. सीबीआय चौकशीची शिफारस केंद्रानेही मान्य करून चुकी केली आहे.महाराष्ट्र सरकारने म्हटले आहे की, सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यूप्रकरणी सीबीआय चौकशीची शिफारस बिहार सरकारने करणे योग्य नाही. केंद्र सरकारने बिहारची अनधिकृत शिफारस मान्य करणे हे केंद्र-राज्य संबंधांच्या घटनात्मक निर्णयाच्या विरोधात आहे.महाराष्ट्र सरकार आणि शिवसेना सुरुवातीपासूनच बिहार सरकारच्या वतीने सुशांत सिंग प्रकरणात सीबीआय चौकशीच्या शिफारशीला विरोध करत आहेत. शिवसेनेचे राज्यसभेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या होत्या की बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार राजकारण करीत आहेत. त्यांची शिफारस घटनात्मक कायद्यांसाठी किंवा सुशांतला न्यायासाठी नाही. कायदा व सुव्यवस्था हा राज्याचा विषय आहे, सीबीआय चौकशीचा निर्णय महाराष्ट्र सरकारच घेऊ शकेल, अशी माहिती आज तकने दिली आहे.

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

...चांगला मेसेज गेला नाही; बिहार पोलीस अधिकाऱ्याला क्वारंटाईन केल्याबद्दल SC ने कान खेचले!

 

Disha Salian Case: नारायण राणेंच्या गंभीर आरोपानंतर पोलिसांचं पुराव्यांसाठी आवाहन

 

खळबळजनक! कारागृहात कैद्याने गळफास लावून केली आत्महत्या 

 

सुशांत राजपूत प्रकरणाच्या तपासासाठी मुंबईत आलेले बिहारचे पोलीस परतले; १२ जणांची केली चौकशी

 

सुशांतच्या डायरीची शेवटची पाने महत्वाची, सुगावा लागू शकतो मारेकऱ्याचा

 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयSushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतPoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्रGovernmentसरकारBiharबिहारCentral Governmentकेंद्र सरकारCBIगुन्हा अन्वेषण विभाग