VIDEO: ...अन् बिहारच्या डीजीपींनी थेट रिया चक्रवर्तीची 'औकात' काढली; ऐका काय म्हणाले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 12:22 PM2020-08-19T12:22:20+5:302020-08-19T12:26:24+5:30

बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी हा अन्यायाविरुद्ध न्यायाचा विजय असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तसेच रिया चक्रवर्तीवर देखील भाष्य केलं आहे.

sushant rajput case bihar dgp gupteshwar pandey says justice is victory against injustice | VIDEO: ...अन् बिहारच्या डीजीपींनी थेट रिया चक्रवर्तीची 'औकात' काढली; ऐका काय म्हणाले

VIDEO: ...अन् बिहारच्या डीजीपींनी थेट रिया चक्रवर्तीची 'औकात' काढली; ऐका काय म्हणाले

Next

नवी दिल्ली - अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं सीबीआयला दिले आहेत. मुंबई पोलिसांनी सीबीआयला सहकार्य करावं, अशा सूचनादेखील न्यायालयानं केल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी हा अन्यायाविरुद्ध न्यायाचा विजय असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तसेच रिया चक्रवर्तीवर देखील भाष्य केलं आहे. थेट रियाची 'औकात' काढली आहे. 

बिहारच्या मुख्यमंत्र्यांबाबत बोलण्याची रिया चक्रवर्तीची 'औकात' नाही असं गुप्तेश्वर पांडे यांनी म्हटलं आहे. तसेच बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळेच आज हे यश मिळालं असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना त्यांनी असं म्हटलं आहे. यासोबतच न्यायालयाच्या निर्णयामुळे आपण प्रचंड आनंदी असल्याचं सांगत हा 130 कोटी जनतेच्या भावनांचा विजय असल्याचंही ते म्हणाले आहेत.

गुप्तेश्वर पांडे यांनी "न्यायालयाच्या निर्णयामुळे 130 कोटी जनतेच्या मनात सर्वोच्च न्यायालयायबद्दल असलेली आस्था अजून दृढ झाली आहे. लोकांचा लोकशाहीवरील विश्वास वाढला आहे. आता लोकांना सुशांत सिंह प्रकरणी न्याय मिळेल असा विश्वास वाटू लागला आहे. ही संपूर्ण देशासाठी मोठी बातमी आहे. आमच्यावर अनेक आरोप केले जात होते. केस दाखल का केली अशी विचारणा होत होती. तपासासाठी अधिकाऱ्याला पाठवलं तर त्याला कैद्याप्रमाणे क्वारंटाईन करण्यात आलं. यावरुन लोकांना काहीतरी गडबड असल्याचं वाटत होतं. आम्ही जे काही काम केलं ते कायदेशीर पद्धतीने केलं. सर्वोच्च न्यायालयानेही त्यावर शिक्कामोर्तब केलं आहे" असं म्हटलं आहे. 

"मुंबई पोलिसांनी केलेला तपास अगदी चुकीचा आणि बेकायदेशीर होता. आम्ही करत असलेल्या तपासातून निकाल हाती येणारच. कारण ही फक्त एका व्यक्तीची, एका कुटुंबाची किंवा माझी वैयक्तिक लढाई नाही तर 130 कोटी जनता ज्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे त्यांची लढाई आहे" असं पांडे यांनी म्हटलं आहे. बिहारच्या मुख्यमंत्र्यांवर भाष्य करण्याची रिया चक्रवर्तीची औकात नाही. बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळेच आज हे यश मिळालं असल्याचं देखील सांगितलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

बापरे! आग्र्यामध्ये प्रवाशांनी भरलेली बस हायजॅक, परिसरात खळबळ

CoronaVirus News : हादरवणारी आकडेवारी! देशातील रुग्णसंख्येने गाठला नवा उच्चांक; 27 लाखांचा टप्पा केला पार

CoronaVirus News : चिंता वाढली! कोरोनावर मात केलेल्या रुग्णांमध्ये पुन्हा दिसताहेत लक्षणं, वेळीच व्हा सावध

"...तर पंजाब पेटून उठेल", मुख्यमंत्र्यांचा केंद्र सरकारला गंभीर इशारा

CoronaVirus News : तंत्रज्ञानाची कमाल! आता चेहऱ्यावर मशीन लावणार मास्क, Video तुफान व्हायरल

"काँग्रेसने 70 वर्षांत काय केलं?, असा प्रश्न विचारत शहा एम्समध्ये उपचारासाठी दाखल"

CoronaVirus News : आनंदाचा 'चौकार'! कोरोनाच्या संकटात आशेचा किरण, 'या' गोष्टींमुळे देशाला मोठा दिलासा

 

Read in English

Web Title: sushant rajput case bihar dgp gupteshwar pandey says justice is victory against injustice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.