शहरं
Join us  
Trending Stories
1
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
2
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
3
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
4
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
5
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
6
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
7
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
8
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
9
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
10
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
11
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
12
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
13
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
14
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
15
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
16
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
17
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
18
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
19
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
20
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
Daily Top 2Weekly Top 5

"मरण समोर दिसत होतं, पण चालकाने ऐकलं नाही"; जबलपूर क्रूझ दुर्घटनेत वाचलेल्या प्रवाशाची धक्कादायक माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2026 12:45 IST

जबलपूर क्रूझ दुर्घटनेत वाचलेल्या प्रवाशाने अंगावर काटा आणणारी आपबिती सांगितली.

Jabalpur Boat Tragedy:मध्य प्रदेशातील जबलपूर येथील बर्गी डॅमच्या बॅकवॉटरमध्ये गुरुवारी संध्याकाळी एक मोठी दुर्घटना घडली. राज्य पर्यटन विभागाची पर्यटकांनी भरलेली क्रूझ नर्मदा नदीत उलटल्याने ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेतून बचावलेल्या प्रवाशांनी प्रशासनाचा ढिसाळपणा आणि क्रूझ कर्मचाऱ्यांच्या असंवेदनशीलतेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

गुरुवारी संध्याकाळी ३० पर्यटकांना घेऊन ही क्रूझ बर्गी डॅममध्ये फेरफटका मारत होती. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यांमुळे पाण्याचा प्रवाह वाढला आणि क्रूझचे संतुलन बिघडून ती पाण्यात उलटली. हवामान खात्याने आधीच यलो अलर्ट जारी केला असतानाही पर्यटकांना घेऊन क्रूझ पाण्यात का उतरवण्यात आली? असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे.

"आम्ही ओरडत होतो, पण क्रूझ चालकाने ऐकले नाही"

या अपघातातून वाचलेले दिल्लीचे रहिवासी प्रदीप कुमार यांनी घडलेला थरार मांडला. या दुर्घटनेत दुर्दैवाने प्रदीप यांनी आपली पत्नी आणि ४ वर्षांच्या चिमुकल्या मुलाला गमावले. प्रदीप यांच्या मते, क्रूझवर ३० प्रवासी होते पण सर्वांसाठी लाईफ जॅकेट उपलब्ध नव्हते. प्रवाशांनी एकमेकांमध्ये जॅकेट वाटून घेतली. बोटीवर केवळ दोन कर्मचारी होते. हवामान बिघडत असल्याचे पाहून प्रवाशांनी आणि किनाऱ्यावरील लोकांनी बोट किनाऱ्याला घेण्याची विनंती केली, पण चालकाने त्याकडे दुर्लक्ष करत बोट पुढेच नेली.

२ मिनिटांत होत्याचं नव्हतं झालं

"अचानक वारे सुटले आणि पाणी खवळले. मी जॅकेट घातलं आणि पुढच्या २-३ मिनिटांतच होत्याचं नव्हतं झालं," अशा शब्दात प्रदीप यांनी आपला आक्रोश व्यक्त केला.

प्रशासकीय चूक की निष्काळजीपणा?

हवामान खात्याने सोसाट्याच्या वाऱ्याचा इशारा दिला असतानाही पर्यटन विभागाने क्रूझ चालवण्याची परवानगी कशी दिली? असा सवाल विचारला जात आहे. आपत्कालीन स्थितीत प्रवाशांना मदत करण्यासाठी क्रूझवर पुरेसे कर्मचारी आणि सुरक्षा साधने नव्हती असाही आरोप करण्यात आला. किनाऱ्यावरील लोकांनी इशारा देऊनही बोट सुरक्षित ठिकाणी नेण्यात चालकाला जमले नाही.

बचावकार्य आणि मदत

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी दोरखंडाच्या साहाय्याने काहींना वाचवले. त्यानंतर एसडीआरएफ आणि स्थानिक बचाव पथकाने रात्रभर शोधमोहीम राबवली. आतापर्यंत १५ जणांना सुखरूप बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राज्यमंत्री राकेश सिंह यांनी घटनास्थळाची पाहणी केली असून ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ४ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Jabalpur cruise tragedy: Survivor recounts horror; boat driver ignored warnings.

Web Summary : A cruise accident in Jabalpur claimed nine lives after a boat capsized in the Narmada River. Survivors allege the boat driver ignored warnings about the weather, and life jackets were insufficient. A survivor lost his wife and child in the tragedy. The government has announced compensation.
टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशAccidentअपघात