सर्व्हे: आज लोकसभा निवडणुका झाल्या तर? भाजप स्वबळावर सरकार स्थापन करणार! कुणाला किती जागा मिळणार? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 00:20 IST2025-02-13T00:17:45+5:302025-02-13T00:20:40+5:30

आज लोकसभा निवडणुका झाल्या तर भारतीय जनता पक्षाला 40.7 टक्के मते मिळतील. तर काँग्रेसला 20.5 आणि इतरांना 38.5 टक्के मते मिळू शकतील...

Survey If Lok Sabha elections are held today BJP will form government on its own know about Who will get how many seats | सर्व्हे: आज लोकसभा निवडणुका झाल्या तर? भाजप स्वबळावर सरकार स्थापन करणार! कुणाला किती जागा मिळणार? जाणून घ्या

सर्व्हे: आज लोकसभा निवडणुका झाल्या तर? भाजप स्वबळावर सरकार स्थापन करणार! कुणाला किती जागा मिळणार? जाणून घ्या

जर देशात आज लोकसभा निवडणुका झाल्या, तर भारतीय जनता पक्ष संपूर्ण बहुमतासह सरकार स्थापन करू शकतो, असे नुकत्याच करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. या सर्वेक्षणानुसार, आज लोकसभा निवडणुका झाल्या, तर भाजपला 281 जागा मिळण्याचा अंदाज आहे. अर्थात भाजप स्वबळावर सरकार स्थापन करू शकते. तसेच काँग्रेसला 78 जागा मिळू शकतात. गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला 99 जागा मिळाल्या होत्या. तसेच इतरांना 184 जागा मिळू शकतात.

आज लोकसभा निवडणुका झाल्यास कुणाला किती मते? किती जागा? 
आज लोकसभा निवडणुका झाल्या तर भारतीय जनता पक्षाला 40.7 टक्के मते मिळतील. तर काँग्रेसला 20.5 आणि इतरांना 38.5 टक्के मते मिळू शकतील. आघाडीच्या दृष्टीने जागांचा विचार करता, आज लोकसभा निवडणुका झाल्या तर, एनडीएला 343 जागा, इंडिया ब्लॉकला 188 तर इतरांना 12 जागा मिळतील.

2 जानेवारी ते 9 फेब्रुवारी दरम्यान करण्यात आले सर्वेक्षण - 
हे सर्वेक्षण इंडिया टुडे-CVoter ने (मूड ऑफ द नेशन (MOTN)) केले आहे. सर्वेक्षणाचा कालावधी 2 जानेवारी 2025 ते 9 फेब्रुवारी 2025 असा आहे. यात भारतातील सर्वच्या सर्व 543 लोकसभा मतदारसंघांमधील 54,418 लोकांसोबत चर्चा करण्यात आली. याशिवाय सी-व्होटरने गेल्या 24 आठवड्यादरम्यान 70,705 लोकांचे मतही जाणून घेतले. अर्थात सर्वेक्षणाचा अहवाल तयार करण्यासाठी एकूण 1 लाख 25 हजार 123 लोकांच्या मतांचे विश्लेषण करण्यात आले.

या सर्वेक्षणाचा उद्देश देशातील सामाजिक, राजकीय आणि आर्थिक स्थिती समजून घेणे, असा होता. हे सर्वेक्षण CATI (कॉम्प्युटर असिस्टेड टेलिफोन इंटरव्ह्यूइंग) पद्धतीने करण्यात आले. यात देशभरातील लोकांना रँडम डायलिंग (RDD) तंत्राचा वापर करून प्रश्न विचारण्यात आले. या सर्वेक्षणात सर्व टेलीकॉम सर्कल्सचा समावेश आहे. तसेच तो भारताच्या लोकसंख्येचे प्रतिनिधित्व सुनिश्चित करतो.

डेटाची अचूकता -
या सर्वेक्षणात त्रुटीचे प्रमाण मॅक्रो पातळीवर ±3% तर मायक्रो पातळीवर ±5% ठेवण्यात आले आहे. भारतीय लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करण्याच्या दृष्टीने यात, जंडर, वय, शिक्षण, उत्पन्न, धर्म, जात, शहरी/ग्रामीण लोकसंख्या आणि गेल्या निवडणुकीतील मतदानाचा पॅटर्न, आदींचा विचार करण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे, देशभरातील लोकांना या सर्वेक्षणात सहभागी होता यावे, यासाठी हे सर्वेक्षण 11 राष्ट्रीय भाषांमधून करण्यात आले आहे. 

Web Title: Survey If Lok Sabha elections are held today BJP will form government on its own know about Who will get how many seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.