शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

आश्चर्य ! एक वर्षाचा असताना अपहरण झालेला चिमुरडा नऊ वर्षांनी परतला

By admin | Updated: August 25, 2016 07:49 IST

फक्त एक वर्षाचा असताना अपहरण झालेला शाहब तब्बल नऊ वर्षानंतर आपल्या घरी परतला आहे. एका दांपत्याने शाहबचं अपहरण केलं होतं, ज्याला पोलिसांनी अटक केली आहे.

- ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 25 - फक्त एक वर्षाचा असताना अपहरण झालेला शाहब तब्बल नऊ वर्षानंतर आपल्या घरी परतला आहे. आपल्या वाढदिवशी आई-वडिलांपेक्षा मोठं गिफ्ट त्याला काय मिळू शकत होतं. नऊ वर्षापूर्वी बालदिनाच्या दिवशी जेव्हा त्याचं अपहरण झालं तेव्हा तो फक्त एक वर्षाचा होता. एका दांपत्याने शाहबचं अपहरण केलं होतं, ज्याला पोलिसांनी अटक केली आहे. 
 
घटना 14 नोव्हेंबर 2007 ची आहे. 45 वर्षीय फरीदा लस टोचण्यासाठी बाबू जगजीवन राम रुग्णालयात गेल्या होत्या. शाहब तेव्हा फक्त एक वर्षाचा होता. फरीदा यांना तेव्हा तिसरा महिनादेखील चालू होता. 'माझ्या मुलाला बेंचवर बसवून अपॉईंटमेंट स्लीप घेण्यासाठी मी रांगेत उभी राहिले होते. त्यावेळी आपल्या मैत्रीणीशी गप्पा मारत असताना फक्त 10 सेकंदासाठी माझं शाहबकडे दुर्लक्ष झालं, आणि त्या 10 सेकंदांनी आमचं आयुष्यच बदललं', अशी आठवण फरीदा सांगतात. 
 
आपला मुलगा  हरवला आहे लक्षात येताच फरीदा आणि रुग्णालयतील कर्मचा-यांनी शोध घेण्यास सुरुवात केली. पण तो सापडला नाही. कृष्णानगर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रारदेखील करण्यात आली होती. पोलिसांनी खूप प्रयत्न केला, मात्र काहीच तपास न लागल्याने 2009मध्ये केस बंद करण्यात आली. 'फरीदा आणि मी रोज दिवसातील चार तास मुलाचा शोध घेण्याचा प्रयत्न करत असे. मी नेहमी त्याचा फोटो माझ्या पाकिटात ठेवत असे, कोणास माहित देव कधी तुमच्या प्रार्थनेला उत्तर देईल', असं शाहबचे वडिल अफसर म्हणाले आहेत.
 
एका लग्नात गेले असताना काही नातेवाईकांशी मुलाच्या अपहरणाबद्दल बोलत असताना त्यांनी शाहबचा फोटो दाखवला. त्यातील एका व्यक्तीने असाच दिसणारा एक मुलगा आमच्या शेजारी राहत असल्याचं सांगितलं. त्यानंतर फरीदा आणि अफसर यांनी तात्काळ पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी आसपासच्या शाळांमध्ये तपास सुरु केला, तेव्हा एका शाळेत त्यांना शाहब दिसला ज्याच्या चेह-यात साम्य होतं. 
 
पोलिसांनी दोन दिवस शाहबवर नजर ठेवली आणि त्याच्या घरचा पत्ता मिळवला. शाहबचे खोटे आई-वडिल नर्गिस आणि मोहम्मद शमीम यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता आपण या मुलाला दत्तक घेतल्याचा दावा त्यांनी केला. मात्र कोणतीही कागदपत्रे ते सादर करु शकले नाही. मूल दत्तक घेण्याच्या प्रक्रिया टाळण्यासाठीच आपण शाहबचं अपहरण केल्याचं अखेर त्यांनी कबूल केलं. पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.