शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
2
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
3
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
4
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
5
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
6
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
7
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
8
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
9
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
10
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
11
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
12
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
13
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
14
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
15
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
16
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
17
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
18
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
19
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
20
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!

पंतप्रधान मोदींनी सुरेश प्रभूंचा राजीनामा ठेवला 'वेटींग'वर , म्हणाले 'थोडं थांबा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2017 20:23 IST

सातत्याने होणा-या रेल्वे अपघातांची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी  'थोडं थांबा,' असं सांगत

ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदींनी  'थोडं थांबा,' असं सांगत अजूनपर्यंत  प्रभू यांचा राजीनामा स्वीकारलेला नाही. पंतप्रधानांनी प्रभूंचा राजीनामा स्वीकारला नसल्यामुळे आणि वाट बघण्यास सांगितले असल्यामुळे ते काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष

नवी दिल्ली, दि. 23 - सातत्याने होणा-या रेल्वे अपघातांची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी  'थोडं थांबा,' असं सांगत अजूनपर्यंत  प्रभू यांचा राजीनामा स्वीकारलेला नाही. स्वत: प्रभू यांनीच टि्वटरवरून ही माहिती दिली.आज पहाटे उत्तर प्रदेशच्या औरेया येथे कैफियत एक्सप्रेसचे आठ डब्बे रेल्वे रूळावरून घसरले, त्यापूर्वी उत्कल एक्सप्रेसचा भीषण अपघात झाला होता.  आठवडयाभरात झालेल्या या दोन मोठ्या रेल्वे अपघातांची नैतिक जबाबदारी स्वीकारुन  केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे आपला राजीनामा सादर केला. दोन रेल्वे अपघातांमध्ये प्रवाशांचे प्राण गेले, अनेक प्रवासी जखमी झाले. त्यामुळे मला प्रचंड  दु:ख, वेदना झाल्या असे ट्वीट प्रभूंनी केले. त्यानंतर त्यांनी पंतप्रधानांकडे राजीनामा देऊ केला.  मात्र, पंतप्रधानांनी प्रभूंचा राजीनामा स्वीकारला नसल्यामुळे आणि वाट बघण्यास सांगितले असल्यामुळे ते काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.  'मी पंतप्रधानांना आज भेटलो. या घटनेची संपूर्ण जबाबदारी घेत मोदींकडे राजीनामा सादर केला. पण त्यांनी मला थोडं थांबायला सांगितलं' असं टि्वट प्रभू यांनी केलं आहे.प्रभूंच्या आधी भारताचे दिवंगत पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांनी  रेल्वेमंत्री असताना तामिळनाडूतील रेल्वे अपघाताची जबाबदारी स्वीकारुन राजीनामा दिला होता. पण पंडित जवाहरलाल नेहरु यांनी त्यांचा राजीनामा फेटाळून लावला होता. तसेच आताचे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही देशाचे रेल्वेमंत्रीपद संभाळले आहे. त्यांनी सुद्धा अशाच प्रकारे रेल्वे अपघाताची जबाबदारी स्वीकारून राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती.