सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 15:45 IST2025-08-05T15:45:22+5:302025-08-05T15:45:50+5:30
सुप्रीम कोर्टाने एका हाय प्रोफाइल घटस्फोट प्रकरणात महत्वाचा निर्णय दिला आहे.

सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
Divorce Case Supreme Court: गेल्या काही काळापासून घटस्फोटानंतर पत्नीकडून भरमसाठ पोटगी मागितल्याच्या घटना समोर येत आहेत. तुम्ही अशा प्रकरणांच्या सुनवाणीचे अनेक व्हिडिओही सोशल मीडियावर पाहिले असतील. आता अशाच एका घटस्फोटाच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. विशेष म्हणजे, पत्नीने पतीकडून पोटगी म्हणून बीएमडब्ल्यू कार आणि १२ कोटी रुपयांची मागणी केली होती.
सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर अखेर पती-पत्नीमधील वाद मिटला. न्यायमूर्ती के विनोद चंद्रन यांच्या निर्णयानुसार, मुंबईतील फ्लॅट आणि फ्लॅटसोबत दिलेले दोन पार्किंग लॉट पत्नीला मिळतील. याव्यतिरिक्त दोन बीएमडब्ल्यू देखील पत्नीला दिल्या जातील. सुनावणीदरम्यान, पत्नीने फ्लॅट आणि बीएमडब्ल्यू कारसह अतिरिक्त १२ कोटी रुपयांची पोटगी मागितली होती. यावर, सरन्यायाधीशांनी आक्षेप घेतला होता आणि खडसावून सांगितले की, तुम्हाला फक्त फ्लॅट मिळेल, नाहीतर तोही मिळणार नाही.
जाणून घ्या प्रकरण ?
या घटस्फोटाच्या प्रकरणात महिलेने तिच्या पतीपासून वेगळे होऊन कोर्टाकडून पोटगी म्हणून १२ कोटींची मागणी केली होती. यासोबतच महिलेने असा युक्तिवाद केला होता की, तिचा नवरा खूप श्रीमंत आहे, म्हणून तिला पैशांसह मुंबईतील एक अपार्टमेंट आणि बीएमडब्ल्यू कारही देण्यात यावी. महिलेने न्यायालयात केलेल्या मागण्या ऐकून तिथे उपस्थित सर्वजण आश्चर्यचकित झाले होते.
या सुनावणीदरम्यान न्यायालयाने म्हटले की, एकतर महिलेला फ्लॅट स्वीकारावा लागेल किंवा एकरकमी ४ कोटी रुपये घ्यावे लागतील. तुम्ही उच्चशिक्षित आहात, त्यामुळे चार कोटी रुपये घ्या आणि पुणे, हैदराबाद, बंगळुरूमध्ये चांगली नोकरी शोधा, असेही कोर्टाने म्हटले होते. आता अखेर आज सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात आपला अंतिम निर्णय दिला आहे. पत्नीला मुंबईतील घरासह दोन कार मिळाल्या, मात्र रोख रक्कम दिली नाही.