शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
4
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
5
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
6
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
7
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
8
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
9
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
10
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
11
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
12
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
13
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
14
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
15
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
16
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
17
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
18
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
19
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
20
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!

पालघर झुंडहत्या प्रकरणाचे आरोपपत्र सुप्रीम कोर्टास हवे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2020 01:20 IST

चिकने महाराज कल्पवृक्षगिरी (७०) व सुशीलगिरी महाराज कल्पवृक्षगिरी (३५), या दोन साधूंची या घटनेत, मुले पळविणारे असल्याच्या संशयावरून, झुंडशाहीने हत्या करण्यात आली होती.

नवी दिल्ली : मुंबईहून गुजरातकडे निघालेल्या दोन साधूंची मोटार रस्त्यात अडवून जमावाकडून त्यांची हत्या करण्यात आल्याच्या घटनेशी संबंधित खटल्यात सादर करण्यात आलेले आरोपपत्र तपासणीसाठी सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी महाराष्ट्र सरकारला दिले.न्या. अशोक भूषण आणि न्या. आर. सुभाष रेड्डी यांच्या खंडपीठाने हे निर्देश देताना असेही सांगितले की, या घटनेला अनेक महिने उलटले असल्यामुळे, जमावापासून साधूंचे रक्षण करण्याऐवजी केवळ बघ्याची भूमिका घेणाऱ्या पोलिसांविरुद्ध काय कारवाई केली याची माहिती, तसेच तपासाच्या प्रगतीचा अहवालही महाराष्ट्र सरकारने सादर करावा.

चिकने महाराज कल्पवृक्षगिरी (७०) व सुशीलगिरी महाराज कल्पवृक्षगिरी (३५), या दोन साधूंची या घटनेत, मुले पळविणारे असल्याच्या संशयावरून, झुंडशाहीने हत्या करण्यात आली होती. हे दोन्ही साधू जुन्या आखाड्याचे होते. त्याच आखाड्याच्या काही अन्य साधूंनी व मृत साधूंच्या काही नातेवाईकांनी मिळून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यांचे वकील अ‍ॅड. शशांक शेखर म्हणाले की, स्वत: पोलीसच या हत्येत सहभागी असल्याने निष्पक्ष तपास होईल, असा विश्वास वाटत नाही. त्यामुळे हा तपास ‘सीबीआय’कडे सोपविण्यात यावा.महाराष्ट्र सरकारचे वकील अ‍ॅड. राहुल चिटणीस यांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेली माहिती न्यायालयास दिली. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सुचविले की, संपूर्ण आरोपपत्रच मागवून घ्यावे म्हणजे काय लागू आहे व काय गैरलागू आहे, हे पाहता येईल. वरील निर्देश देऊन खंडपीठाने पुढील सुनावणी तीन आठवड्यांनी ठेवली.याआधीही याच प्रकरणाशी संबंधित आणखी दोन याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्या गेल्या आहेत. त्यापैकी एका याचिकेत ‘सीबीआय’ तपासाची, तर दुसरीकडे ‘एनआयए’ तपासाची मागणी करण्यात आली आहे. यापैकी पहिल्या याचिकेवर न्यायालयाने ११ जूनमध्ये नोटीस काढली असून, महाराष्ट्र सरकारला उत्तराचे प्रतिज्ञापत्र करण्यास सांगितले आहे. त्या याचिकांमध्ये राज्य सरकारने तपास एकांगी किंवा सदोष पद्धतीने केला गेल्याचा इन्कार केला आहे.

टॅग्स :palgharपालघरCrime Newsगुन्हेगारीSupreme Courtसर्वोच्च न्यायालय