‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 23:54 IST2025-12-27T23:51:59+5:302025-12-27T23:54:00+5:30
Aravali Mountain: गेल्या काही दिवसांपासून अरवली पर्वतावरून मोठा वाद उदभवला आहे. तसेच अरवली पर्वतरांगेला वाचवण्यासाठी पर्यावरणप्रेमींसह सर्वसामान्यांनी सोशल मीडियावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. आता या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने स्वत: दखल (सुओ मोटो) घेतली आहे.

‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
गेल्या काही दिवसांपासून अरवली पर्वतावरून मोठा वाद उदभवला आहे. तसेच अरवली पर्वतरांगेला वाचवण्यासाठी पर्यावरणप्रेमींसह सर्वसामान्यांनी सोशल मीडियावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. आता या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने स्वत: दखल (सुओ मोटो) घेतली आहे. आता सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृ्त्वाखालील तीन न्यायमूर्तींचं खंडपीठ या संपूर्ण विवादावर सोमवारी सुनावणी करणार आहेत.
या खंडपीठामध्ये सरन्यायाधीस सूर्यकांत यांच्यासोबत जे.के. माहेश्वरी आणि न्यायमूर्ती ए.जी. मसीह यांचा समावेश आहे. अरवली जगातील सर्वात जुन्या पर्वतरांगेपैकी एक आहे. ती सुमारे ७०० किमी लांब आहे. ती दिल्ली एनसीआरला थार वाळवंटामधून येणारी धूळ आणि वाळवंटीकरणापासून वाचवणाऱ्या एका नैसर्गिक ढालीसारखं काम करते.
दरम्यान, हल्लीच सरकारने अरवली पर्वताबाबत १०० मीटर उंचीची नवी व्याख्या केल्याने मोठा वाद उद्भवला होता. तसेच या नियमामुळे अरवली पर्वताचा ९० टक्के भाग संपुष्टात येईल, अशी भीती पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केली होती. अरवली पर्वत वाचवण्यासाठी पर्यावरणप्रेमींपासून सर्वसामान्यांपर्यंत सर्वांनी प्रखरतेने आवाज उठवल्याने अखेरीस केंद्र सरकारने खाणकामाचे नवे पट्टे देण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेतला. मात्र हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. तसेच सोमवारी होणारी सुनावणी अरवली पर्वताच्या अस्तित्वाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे.