Ayodhya Case : अयोध्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं 18 पुनर्विचार याचिका फेटाळल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2019 18:20 IST2019-12-12T18:19:50+5:302019-12-12T18:20:01+5:30
Ayodhya Case : सर्वोच्च न्यायालयानं अयोध्या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या सर्वच याचिका फेटाळून लावल्या आहेत.

Ayodhya Case : अयोध्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं 18 पुनर्विचार याचिका फेटाळल्या
नवी दिल्लीः सर्वोच्च न्यायालयानंअयोध्या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या सर्वच याचिका फेटाळून लावल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयातअयोध्या प्रकरणात जवळपास 18 पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आलेल्या होत्या. त्या सर्वच याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळल्या आहेत. पाच न्यायायाधीशांच्या घटनापीठासमोर सर्व याचिकांवर सुनावणी झाली.
या घटनापीठामध्ये न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती अशोक भूषण, न्यायमूर्ती एस. ए नजीर आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना यांचा समावेश होता. यातील 9 याचिका पक्षकारांच्या वतीने करण्यात आल्या होत्या, तर इतर 9 याचिका इतर याचिकाकर्त्यांनी केल्या होत्या. यापूर्वी निर्मोही आखाड्यानंही पुनर्विचार याचिका दाखल केली होती. निर्मोही आखाड्यानं आपल्या याचिकेत म्हटलं होतं, की अयोध्या विवादप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाला एक महिना झाला, मात्र अजूनही राम मंदिर ट्रस्टमधील त्यांची भूमिका स्पष्ट झालेली नाही. मात्र त्यांची याचिका फेटाळण्यात आली होती.
Supreme Court dismisses all the review petitions in Ayodhya case judgment. pic.twitter.com/vZ2qKdk59A
— ANI (@ANI) December 12, 2019