मद्यपानामुळे माणूस जनावर बनतो; आरोपी पिता विकृत माणूस, दिलासा देण्यास तो पात्र नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 12:05 IST2025-05-30T12:05:38+5:302025-05-30T12:05:38+5:30

पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीत पतीने मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे.

Supreme Court refuses to grant bail to father of doctor who sexually abused daughter | मद्यपानामुळे माणूस जनावर बनतो; आरोपी पिता विकृत माणूस, दिलासा देण्यास तो पात्र नाही

मद्यपानामुळे माणूस जनावर बनतो; आरोपी पिता विकृत माणूस, दिलासा देण्यास तो पात्र नाही

नवी दिल्ली : मद्यपान केल्यावर माणूस जनावर बनतो, असे निरीक्षण गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले. हृदयरोग तज्ज्ञ असणाऱ्या डॉक्टर पित्याने सात वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला.

या प्रकरणी झालेली शिक्षा माफ होण्यासाठी नराधम पित्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, हा विकृत माणूस असून, त्याला शिक्षा निलंबित करण्याची मागणी करण्याचा अधिकार नसल्याचा दावा करीत सुप्रीम कोर्टाने स्थानिक न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. पित्याला जामीन देणार नसल्याचे खंडपीठाने नमूद केले.

मुलगी पित्यावर आरोप कशाला करेल? 

स्वतःच्या वडिलांविरुद्ध मुलगी साक्ष का देईल?. मुलगी लहान असूनही तिला उलटतपासणीला सामोरे जावे लागले आहे. मद्य पिल्यावर माणूस जनावर बनतो. खरे तर आम्ही हे विधान करायला नको, खंडपीठ म्हणाले.

दिलासा देण्यास पात्र नाही

 तुम्ही कोणत्याही प्रकारचा दिलासा देण्यासाठी पात्र नाहीत. पीडित मुलीने पित्याविरोधात जबाब दिला आहे. तो एक विकृत माणूस आहे.

मुलीवर अत्याचार केले तेव्हा तो माणूस नशेत होता, असे तोंडी निरीक्षण नोंदवत न्या. बी. व्ही. नागरत्ना व सतीश चंद्र शर्मा यांच्या खंडपीठाने आरोपीला दिलासा देण्यास स्पष्ट नकार दिला. 

आरोपीच्या वकिलाने मुलीला साक्ष शिकवण्यात आल्याचा आरोप केला होता. मात्र, खंडपीठाने हे आरोप फेटाळून लावत नराधम पित्याला दिलासा देण्यास नकार दिला.

काय आहे प्रकरण? 

पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीत पतीने मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. ती वाराणसीत राहत असून, पती हल्द्वानी येथे राहतो, तिथे तो एक नर्सिंग होम चालवतो. अशी माहिती पत्नीने न्यायालयाला दिली आहे. 

२३ मार्च २०१८ रोजी पती मुलीला 3 घेऊन हल्द्वानीला गेला. मात्र, ३० मार्च रोजी पत्नीला फोन करून मुलीला घेऊन जाण्याचे त्याने सांगितले. नंतर मुलीने तिच्या आईला सांगितले की तिचे वडील वाईट व्यक्ती आहेत आणि त्यांनी तिच्याशी वाईट पद्धतीने वागले, आईने तक्रारीत म्हटले आहे.
 

Web Title: Supreme Court refuses to grant bail to father of doctor who sexually abused daughter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.