'तुमच्या यूट्यूब चॅनेल्सवर माफी मागा', दिव्यांगांची खिल्ली उडवल्याप्रकरणी SC चे समय रैनासह ५ जणांना आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 13:30 IST2025-08-25T13:28:56+5:302025-08-25T13:30:12+5:30

Supreme Court Order: दिव्यांग आणि गंभीर शारीरिक व्याधींनी ग्रस्त असलेल्या लोकांची खिल्ली उडवल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने समय रैनासह पाच जणांना फटकारले.

Supreme Court Order: 'Apologize on your YouTube channels', SC orders Samay Raina and 5 others for mocking the disabled | 'तुमच्या यूट्यूब चॅनेल्सवर माफी मागा', दिव्यांगांची खिल्ली उडवल्याप्रकरणी SC चे समय रैनासह ५ जणांना आदेश

'तुमच्या यूट्यूब चॅनेल्सवर माफी मागा', दिव्यांगांची खिल्ली उडवल्याप्रकरणी SC चे समय रैनासह ५ जणांना आदेश

Supreme Court Order: दिव्यांग आणि गंभीर शारीरिक व्याधींनी ग्रस्त असलेल्या लोकांची खिल्ली उडवल्याप्रकरणी स्टँडअप कॉमेडियन समय रैनासह पाच जणांना सर्वोच्च न्यायालयाची बिनशर्त माफी मागितली आहे. न्यायालयाने या पाच जणांना त्यांच्या यूट्यूब चॅनेल आणि इतर प्लॅटफॉर्मद्वारेही माफी मागण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, भविष्यात असे विनोद टाळावेत आणि त्यांच्या कार्यक्रमांद्वारे इतरांनाही असे करू नये याची जाणीव करून द्यावी, असेही म्हटले.

न्यायालयात बिनशर्त माफी मागणाऱ्यांमध्ये समय रैनासह विपुन गोयल, बलराज घई, सोनाली ठक्कर आणि निशांत तंवर यांचा समावेश आहे. सुनावणीदरम्यान, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सांगितले की, ते अशा कार्यक्रमांबाबत मार्गदर्शक तत्त्वे तयार करणार आहे. त्यामध्ये कोणत्याही व्यक्ती किंवा गटाच्या प्रतिष्ठेला धक्का न लावता विनोदी कार्यक्रम सादर केला पाहिजे याची काळजी घेतली जाईल.

याचिका कोणी दाखल केली?
एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, क्युअर एसएमए फाउंडेशन ऑफ इंडियाने दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाल्य बागची यांच्या खंडपीठाने सुनावणी केली. ही संस्था स्पाइनल मस्क्युलर अ‍ॅट्रोफीच्या रुग्णांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी काम करते. याचिकेत अपंगांची खिल्ली उडवण्यावर किंवा त्यांच्यावर विनोद करण्यावर आक्षेप घेण्यात आला होता.

मार्गदर्शक तत्त्वे बनवा, सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला निर्देश 
सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका इंडियाज गॉट लेटेंट शो वादाशी जोडली, ज्यामध्ये युट्यूबर रणवीर अलाहाबादिया याच्यावरही अपमानास्पद टिप्पण्या केल्याचा आरोप करण्यात आला होता. केंद्राच्या वतीने अॅटर्नी जनरल आर वेंकटरमणी म्हणाले की, सरकार विनोदी कलाकार आणि इन्फ्लुएंसर्ससाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करेल, ज्यामध्ये त्यांना एका मर्यादेत विनोद करावा लागेल. यावर न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले की, केवळ या प्रकरणाच्या आधारे मार्गदर्शक तत्त्वे तयार केली जाऊ नयेत, तर ती सर्वसमावेशक तयार केली पाहिजेत आणि यावर तज्ञांचे मत देखील घेतले पाहिजे.

Viral: रीलचा नाद जीवावर बेतला; २२ वर्षीय युट्यूबर धबधब्यामध्ये बुडाला, घटनाकॅमेऱ्यात कैद

Web Title: Supreme Court Order: 'Apologize on your YouTube channels', SC orders Samay Raina and 5 others for mocking the disabled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.