शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

Param Bir Singh: कुठे आहेत परमबीर सिंग? अखेर ठावठिकाणा समजला; माजी पोलीस आयुक्तांना सर्वोच्च दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 1:01 PM

Supreme court grants Param Bir Singh protection from arrest ask him to join probe : परमबीर सिंग यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा; ठाकरे सरकारला नोटीस

नवी दिल्ली: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग Param Bir Singh  गेल्या ९ महिन्यांपासून बेपत्ता आहेत. त्यांचा ठावठिकाणा अद्याप समजू शकलेला नाही. परमबीर सिंग यांना अटकेपासून संरक्षण देण्याची याचिका त्यांच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात केली आहे. सिंग नेमके कुठे आहेत, असा सवाल न्यायमूर्तींनी गेल्या आठवड्यात सुनावणी दरम्यान उपस्थित केला. त्याला सिंग यांच्या वकिलांनी आज उत्तर दिलं.

परमबीर सिंग भारतातच आहेत. ते देश सोडून गेलेले नाहीत. सर्वोच्च न्यायालयानं त्यांना अटकेपासून संरक्षण दिल्यास ते पुढील ४८ तासांत सीबीआयच्या कार्यालयात अथवा कोर्टात हजर होतील, असं सिंग यांच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं त्यांना अटकेपासून दिलासा दिला. परमबीर यांनी तपासाला सहकार्य करावं, असे आदेश न्यायमूर्तींनी दिले.परमबीर सिंग देशातच आहेत. ते फरार झालेले नाहीत. मुंबई पोलिसांकडून सिंग यांच्या जीवाला धोका आहे. त्यामुळेच ते समोर येत नाहीत, असा युक्तिवाद सिंग यांच्या वकिलांनी केला. सर्वोच्च न्यायालयानं अटकेपासून दिलासा दिल्यास सिंग पुढील ४८ तासांत सीबीआयच्या कार्यालयात हजर राहतील, असं सिंग यांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितलं. त्यानंतर सिंग यांना अटकेपासून संरक्षण देत तपासाला सहकार्य करण्याची सूचना केली.

सर्वोच्च न्यायालयानं परमबीर सिंग यांच्या याचिकेवर सुनावणी घेण्याची तयारी दर्शवली. यासोबत न्यायालयानं ठाकरे सरकार आणि सीबीआयला नोटिसदेखील बजावली. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ६ डिसेंबरला होईल. सर्वोच्च न्यायालयानं परमबीर यांना अटकेपासून संरक्षण दिल्यानं आता ते सर्वांसमोर येण्याची शक्यता वाढली आहे. मार्चपासून परमबीर सिंग बेपत्ता आहेत. ते देशाबाहेर पळून गेल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी सुरू होती.

टॅग्स :Param Bir Singhपरम बीर सिंगSupreme Courtसर्वोच्च न्यायालयCBIगुन्हा अन्वेषण विभाग