शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
3
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
4
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
5
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
6
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
7
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
8
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
9
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
10
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
11
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
12
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
13
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
14
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
15
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
16
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
17
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
18
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
19
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत

निवडणुकीत होतोय काळ्या पैशाचा वापर, अटर्नी जनरलची सर्वोच्च न्यायालयात कबुली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2019 6:57 PM

निवडणुकीतील अटी आणि शर्थीचे भंग केल्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं अटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांना प्रश्न विचारले आहेत.

नवी दिल्ली- निवडणुकीतील अटी आणि शर्थीचे भंग केल्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं अटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांना प्रश्न विचारले आहेत. निवडणुकीदरम्यान काळ्या पैशाचा वापर होत आहे, अशा आशयाची एक याचिका सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली होती. त्यावरच्या सुनावणीदरम्यान अटर्नी जनरल म्हणाले, निवडणुकीत काळा पैसा वापरला जातो यात तथ्य आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी बेकायदेशीर पद्धती वापरल्या जातात. यात काहीही नवीन नाही.आधीपासूनच हे होत आलं आहे. राजकीय पक्षांचे नेते हेलिकॉप्टरनं दौरे करतात, ज्यावर भरमसाट पैसा खर्च होतो. एवढा पैसा कुठून येतो. तो काळा पैसाच असतो, अशी कबुली खुद्द अटर्नी जनरलनं दिली आहे. केंद्र सरकारनं काळा पैसा संपवण्यासाठी इलेक्टोरल बाँड संकल्पना आणली होती. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्याच्या पीठानं इलेक्टोरोल बाँडसंदर्भातील याचिकेवर सुनावणी केली. न्यायालयानं निवडणूक संपेपर्यंत इलेक्टोरल बाँडवर बंदी आणली आहे. 

लोकसभेच्या निवडणुकांमधील काळ्या पैशाचा वापर रोखण्यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे आयकर विभाग सज्ज झाला असून, यासाठी खास पथके तैनात करण्यात आली आहेत. अबकारी खाते, पोलीस खाते यांच्या सहकार्याने आयकर खातेही आता सज्ज झाले आहे. या काळामध्ये बॅँकांमध्ये होणाऱ्या मोठ्या रकमांच्या व्यवहारांची माहिती बॅँकांनी निवडणूक आयोगाला देण्याची सक्ती करण्यात आली आहे. या माध्यमातून तसेच मौल्यवान वस्तूंच्या मोठ्या प्रमाणावरील खरेदीवरही आयकर खात्याची नजर राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.विमानतळांवरही पथके करणार तैनातविभागातील सर्व विमानतळांवरही आयकर विभागाची नजर राहणार असून, प्रत्येक विमानतळावर पथके तैनात केली जाणार आहेत.  विमानतळांवर नियमितपणे विमानांचे आगमन-निर्गमन होते तेथे तसेच अन्य ठिकाणीही विमाने तसेच हेलिकॉप्टरने येणारे प्रवासी तसेच कर्मचाऱ्यांचीही तपासणी होऊ शकते.

टॅग्स :black moneyब्लॅक मनी