'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 12:58 IST2025-11-07T12:57:40+5:302025-11-07T12:58:19+5:30
'संघाने भारताच्या संविधानाचा दुरुपयोग केला; गांधी हत्येत संघाचा सहभाग!'

'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
Mallikarjun Kharge Congress: आज 'वंदे मातरम्' गाण्याला 150 वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. मात्र, आता यावरुन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) आणि भारतीय जनता पक्षावर तीव्र टीका केली आहे. 'संघाने राष्ट्रीय आंदोलनाच्या काळात ब्रिटिश सरकारचा साथ दिला आणि देशाच्या संविधानाचा अपमान केला,' असा आरोप खरगेंनी केला आहे.
संघाने राष्ट्रीय ध्वज फडकवला नाही
खरगे यांनी शुक्रवारी (7 नोव्हेंबर) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर एक पोस्ट शेअर करत संघावर निशाणा साधला. त्यांनी लिहिले म्हटले, 'आरएसएसने 52 वर्षांपर्यंत राष्ट्रीय ध्वज फडकवला नाही. आज जे लोक स्वतःला राष्ट्रवादाचे ठेकेदार म्हणवतात, त्यांनी त्यांच्या शाखांमध्ये कधीही ‘वंदे मातरम्’ किंवा ‘जन गण मन’ गायले नाही. त्याऐवजी ते ‘नमस्ते सदा वत्सले’ हे गाणे गातात, जे राष्ट्राचे नव्हे तर संघटनेचे गौरवगान आहे. 1925 साली स्थापन झाल्यापासून संघाने ‘वंदे मातरम्’पासून नेहमीच अंतर ठेवले आणि त्यांच्या साहित्यामध्ये या गीताचा एकही उल्लेख नाही.'
भारत के राष्ट्रीय गीत - वंदे मातरम् की 150वीं वर्षगांठ पर देशवासियों के नाम मेरा संदेश -
— Mallikarjun Kharge (@kharge) November 7, 2025
आज भारत के राष्ट्रीय गीत - वंदे मातरम् के 150 वर्ष पूरे हो रहे हैं, जिसने हमारे राष्ट्र की सामूहिक आत्मा को जागृत किया और स्वतंत्रता का नारा बन गया। बंकिम चंद्र चट्टोपाध्याय द्वारा रचित,… pic.twitter.com/vbKJELafHB
गांधी हत्येत संघाचा सहभाग
काँग्रेस अध्यक्षांनी पुढे आरोप केला की, 'हे सर्वज्ञात सत्य आहे की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघ परिवाराने राष्ट्रीय आंदोलनात भारतीयांच्या विरोधात ब्रिटिशांचा साथ दिला. त्यांनी 52 वर्षे राष्ट्रीय ध्वज न फडकवता, भारताच्या संविधानाचा दुरुपयोग केला. महात्मा गांधी आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांचा अपमान केला आणि सरदार पटेल यांच्या शब्दांत, गांधीजींच्या हत्येत देखील सहभागी होते."
काँग्रेसला वंदे मातरम् आणि जन गण मन यांचा अभिमान
'काँग्रेस पक्षाला ‘वंदे मातरम्’ आणि ‘जन गण मन’ या दोन्ही राष्ट्रगीतांचा अतूट अभिमान आहे. 1896 पासून आजपर्यंत काँग्रेसच्या प्रत्येक अधिवेशनात, ब्लॉक स्तरावरील बैठकीतही हे दोन्ही गीत अभिमानाने आणि श्रद्धेने गायले जातात. हीच भारताच्या एकतेची आणि गौरवाची ओळख आहे,' अशी टीका मल्लिकार्जुन खरगे यांनी संघ आणि भाजपवर केली. यावरुन आता राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे.